गुन्हेपुणे

पुणे विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई. सराईत गुन्हेगाराकडून पकडले तब्बल ५ पिस्टल व १४ जिवंत राऊंड”

(श्री. नरसिंग कांबळे – ✍️ मुख्य संपादक)

पुणे : दिनांक ३१/०७/२०२२ रोजी ५ वाजता सुमारास विमानतळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे व तपास पथकातील काही स्टाफ असे विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये राजकीय परिस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पेट्रोलिंग करीत असताना डॅशिंग पोना सचिन जाधव व प्रदीप मोटे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की फॉरेस्ट पार्क रोडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील लिंबाच्या झाडाखाली एक इसम थांबलेला असून त्याच्याकडे पिस्टल व काही जिवंत राऊंड असून तो कोणाची तरी वाट पाहत आहे. त्याप्रमाणे सदरची बातमी पुणे शहर विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव यांना कळवली असता त्यांनी बातमीची खात्री करून शहाणीशा करून कारवाई करा असे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे व तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ढावरे व स्टाफ यांनी सापळा लावून इसम राहुल गोपाळ गवळी (वय – 35 वर्ष. राहणार बारीवाडा ता. चोपडा जी. जळगाव) यास पकडले असता त्याच्याकडे २,२६,४०० (दोन लाख सव्वीस हजार चारशे रुपये) किंमतीचे पाच गावठी बनावटीचे पिस्टल व १४ जिवंत राऊंड मिळून आले असून ते पोलीसांनी जप्त केले आहेत.

 

सदर आरोपीविरुद्ध विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे
गु. र. नं. २८४/२०२२ शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३, २५, २९ व महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदरचा पिस्टल कुठून व पुण्यात कशासाठी आणले होते याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पुणे शहर पोलीस आयुक्त – अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त – संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग – नामदेव चव्हाण, परिमंडळ ४ चे पोलीस उपआयुक्त – रोहीदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग – किशोर जाधव, यांच्या आदेशान्वये विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक – भरत जाधव व पोलीस निरीक्षक गुन्हे – मंगेश जगताप, विमानतळ पोलिस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे पोलीस स्टॉफ सपोफौ अविनाश शेवाळे, पोलीस हवालदार सचिन कदम, डॅशिंग पोलीस नाईक सचिन जाधव, प्रदीप मोटे, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, संजय असवले यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra