गुन्हेपुणे

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ८ जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; ९४ आरोपींविरुद्ध कारवाई, तब्बल १९.७० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

आ जाओ खिलाडी, जुगार का मेला लगा है बीबवेवाडी...! गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून पुणे शहरातील अवैध धंद्यावर सुरू असलेल्या धाडी सत्रांमुळे काही ठिकाणी अवैध धंदेवाल्यांनी आपले धंदे बंद केले. पण, बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन लाॅटरीच्या नावाखाली बेसुमार जुगार सुरु होता‌. त्यामुळे इतर विभागातील खेळीसुद्धा त्या परिसरात जात होते. याबाबत दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाकडून गेल्या आठवड्यापासून रेकी करण्यात आली होती. तिकडचे लाॅटरी जुगाराच्या मालकांनी खेळींना आकर्षित करण्यासाठी काही एजंट नेमले होते. ते खेळींना मेसेज पाठवत होते, 'आ़ जाओ खिलाडी, जुगार का मेला लगा है बिबवेवाडी..!'

(श्री. नरसिंग कांबळे – ✍️ मुख्य संपादक)

बिबवेवाडी : पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ जुगार अड्डयांवर छापे टाकून १९.७० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकूण ९४ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई केलेल्या आरोपींविरुद्ध बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ४२० सह १२० (ब), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ अ, ५ तसेच इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम ६६ (क) व ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिं.२९ रोजी दुपारी अवैध मटक्याच्या ऑनलाईन धंद्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, के.के. मार्केट व संविधान चौक परिसरात अनुक्रमे माऊली एंटरप्राईजेस, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, लक्ष्मी ऑनलाईन लाॅटरी सेंटर, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस लाॅटरी सेंटर, श्री गणेश एंटरप्राईजेस लाॅटरी सेंटर, श्री गुरुदत्त एंटरप्राइजेस लॉटरी सेंटर अशा एकूण सहा दुकानात व दोन सार्वजनिक ठिकाणी बाहेर दुचाकीवर सुरू असलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन लाॅटरी मटका, कल्याण मटका, व्हिडिओ गेम्स व इतर प्रकारचे जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळ खेळत असल्याचे समोर आले. त्यामुळे पंच, बनावट ग्राहक व पोलीस पथकाने सदर ठिकाणी दुपारी छापा टाकून मोबाईलचा वापर करुन ऑनलाईन लाॅटरी जुगार, कल्याण मटका तसेच इतर प्रकारचे जुगार वगैरे खेळणारे, खेळवणारे व पाहीजे आरोपी असे एकुण ९४ इसमांविरुद्ध भा. दं. वि. कलम ४२०, सह कलम १२० (ब), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ (अ), ५ व १२ (अ) तसेच इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम ६६ (सी) व (डी) अन्वये बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे कायदेशीर गुन्हा दाखल केला.

‘एकूण ४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दुकान मालक, खेळणारे, लॉटरी ऍप चालवणारे व इतर अशांचा समावेश आहे. तसेच, २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकीचे मालक/ चालक त्या सोडून पळाले आहेत. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तसेच, ८ अड्डयावरून पळूण गेलेले एकूण २१ अनोळखी राईटर्स व खेळी ज्यांचे नाव पत्ते माहित नाही अशांचा देखील पोलीस शोध घेत आहे. तसेच, माऊली इंटरप्राईजेस लॉटरी सेंटर व श्री गणेश लॉटरी सेंटर यांचे मालक व rajwin.com ani loto.com या ऑनलाईन लॉटरीचे मालक व बुकिंग यांचाही शोध पोलीस घेत आहे.

श्री. राजेश पुराणिक – वरिष्ठ पोलीस निरीक्षक सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पुणे

 या लॉटरी दुकानावरती कारवाई करण्यात आली आहे

दुकान क्रमांक 1 – माऊली इंटरप्राईजेस लाॅटरी सेंटर, के. के. मार्केटरोड येथील जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी

दुकान क्रमांक – 2, श्री स्वामी समर्थ इंटरप्राईजेस लाॅटरी सेंटर, के.के. मार्केट रोड, येथील ऑनलाईन लाॅटरी व अन्य जुगार घेणारा मालक, रायटर्स, खेळी

दुकान क्रमांक – 3, लक्ष्मी ऑनलाईन लाॅटरी सेंटर येथील ऑनलाईन जुगार व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी

दुकान क्रमांक -4, श्री स्वामी समर्थ इंटरप्राईजेस लाॅटरी सेंटर, संविधान चौक येथील ऑनलाईन व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी

दुकान क्रमांक – 5, श्री गणेश इंटरप्राईजेस लाॅटरी सेंटर, संविधान चौक येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी

दुकान क्रमांक – 6, श्री गुरुदत्त इंटरप्राईजेस लाॅटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी

केके मार्केट चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकलवर जुगार खेळणारे व खेळवणारे असे 17 आरोपी पोलीस रेड झाल्यावर जुगाराची साधने व दुचाकी वाहने तेथेच टाकून पळून गेलेले आहेत. संविधान चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकलवर जुगार खेळणारे व खेळवणारे असे 10 आरोपी पोलीसांची रेड झाल्यावर जुगाराची साधने व दुचाकी वाहन तेथेच टाकून पळून गेलेले आहेत.या कारवाईमध्ये आरोपीकडून व घटनास्थळावरून एकूण 19,70,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रोख रुपये 84,130 तसेच 18,86,550 रुपये किंमतीचे 32 मोबाईल सेट्स, 27 दुचाकी वाहने व जुगाराचे साहित्य यांचा समावेश आहे.

सदरची कारवाई अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्रीनिवास घाटगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली, सामाजिक सुरक्षा विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंधरकर, पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस हवालदार राजश्री मोहिते, पोलीस हवालदार मनिषा पुकाळे, पोलीस हवालदार राजेंद्र कुमावत, पोलीस नाईक अण्णा माने, पोलीस नाईक प्रमोद मोहीते, पोलीस नाईक इरफान पठाण, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, पोलीस शिपाई अमित जमदाडे, पोलीस शिपाई संदीप कोळगे यांच्या पथकाने केली आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra