पुणे शहरात एकाच वेळी सहा जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे छापे; ५५ जणांवर कारवाई

पुणेः शिवाजीनगर पोलिस स्टेशन हद्दीत एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचे छापे टाकून सुमारे ४.५५ लाख रुपयांसह मुद्देमाल हस्तगत केला असून, एकूण ५५ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
मंगळवार सायंकाळी सुमारास अवैध मटक्याच्या ऑनलाईन धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये, पुणे महापालिका कार्यालयालगत असलेल्या मंगला टॉकीज चौक, शिवाजी नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील, रामसर बेकरी कॉर्नर शेजारच्या अनुक्रमे स्वस्तिक लॉटरी सेंटर, स्टार लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई प्रतिक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर अशा एकूण सहा दुकानात सुरू असलेल्या ऑनलाइन मटका व इतर प्रकारचे जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळत व खेळवत असलेचे समजले होते. पंच, बनावट ग्राहक व पोलिस पथकासह जाऊन, सदर ठिकाणी १६.०५ वा. चे सुमारास छापा टाकून मोबाईल व संगणकाचा वापर करुन ऑनलाईन मटका व इतर जुगार वगैरे खेळणारे, खेळवणारे व पाहीजे आरोपी असे एकूण ५५ जणांविरुद्ध भा. दं. वि. कलम ४२०, सह कलम १२० (ब), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४(अ) व ५ तसेच इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम ६६ (सी) व (डी) अन्वये शिवाजी नगर पोलिस ठाणे येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर ठिकाणी अटक/कारवाई केलेल्या आरोपींंची नावे पुढीलप्रमाणेः
दुकान क्रमांक १.
स्वस्तिक लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी अशा आरोपींची नांवे
१) अब्दुल रशीद हबीब मोहम्मद मेमन, वय- ५२ वर्षे, धंदा – ऑनलाईन लॉटरी मालक, रा.ठी. शिवाजीनगर, तोफखाना २१/२३, पुणे.
२) विजय श्रीरंग बनकर, वय ५२ वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. २२५ शिवाजीनगर गावठाण, पुणे-३७.
३) राजेंद्र हरिभाऊ माने, वय-५३ वर्षे, धंदा – नोकरी, रा. ठी. सर्वे नंबर ७, तळजाई पठार, धनकवडी, पुणे.
४) सतीश किसन बोगार, वय – ४८ वर्षे, धंदा – फॅब्रिकेशन, रा.ठी. साठे वस्ती, महादेव मंदिराजवळ, चाळ नंबर ४, घर नंबर ४, लोहगाव पुणे –
५) किशोर रमेश देवकुळे, वय – ३० वर्षे, धंदा – स्विगी डिलिव्हरी बॉय, रा. ठी. दीप बंगला चौक, महाले नगर, म्हसोबा मंदिर समोर, वडारवाडी, पुणे
६) बच्चेलाल भगवती गौड, वय – ४८ वर्षे, धंदा नोकरी, रा. ठी. मस्तानी आईस्क्रीमसमोरची बिल्डिंग, बुधवार पेठ, पुणे.
७) श्रावणसिंग दौलतसिंग नाथावत, वय- ४० वर्षे, धंदा- नोकरी, रा.ठी. सभा भवनसमोर, रोहित लॉटरी, बुधवार पेठ, पुणे.
८) संदीप यशवंत राजपूत, वय ३९ वर्षे, धंदा – नोकरी, रा. ठी. शिवनगर, तापकीर चाळ, सुतारवाडी, पुणे.
दुकान क्रमांक – २.
स्टार लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स, खेळी यांची नांवे.
९) प्रविण गुलाबराव शेळके, वय-५२ वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. सर्व्हे नंबर २२/६६, प्रितम हाईट्स, बालाजीनगर, धनकवडी, पुणे.
१०) रियाज बादशा हणुरे, वय ३८ वर्षे, धंदा जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. सर्व्हे नंबर ४२७, गुलटेकडी, इंदिरानगर, पुणे – ३७.
११) रफिक अहमद शेख, वय- ४० वर्षे, धंदा जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. गोसावी वस्ती, वैधवाडी, हडपसर, पुणे – १३.
१२) बाळासाहेब गणेश जेधे, वय-३५, धंदा -जुगार मालक, रा.ठी. स.नं ३८२, बरके आळी, सोमवार पेठ, पुणे.
१३) मंगेश आबासाहेब शितोळे, वय-३४ वर्षे, जुगार खेळणारा, रा. शितोळे बिल्डींग, जुनी सांगवी शेवट बस स्टॉप, पिंपरी चिंचवड, पुणे.
१४) किसन प्रकाश तेलोरे,वय-३८ वर्षै, धंदा जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा.ठी. स.नं.१३/१४, पुष्पक गॅस गोडाऊनचे मागे, बिबवेवाडी, पुणे.
१५) अजय बाबुराव शिवमोरे, वय – २९ वर्षे, धंदा – जुगार खेळणारा, रा.ठी. शिवशंकर कॉलनी, थेरगांव, पिंपरी चिंचवड, पुणे.
दुकान क्रमांक ३.
सवेरा लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स व खेळी यांची नांवे.
१६) राजेश प्रेमचंद यादव, वय – ३५ वर्षे, धंदा – जुगार घेणारा मालक, रा. दुगदचाळ, संतोष नगर, कात्रज, पुणे.
१७) दिपक मथुरावाला ओझा, वय – २१ वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. ३०९, सोमवार पेठ, जोशीवाडा, पुणे.
१८) किशोर गणपती नगराळे, वय ३० वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. आयान हॉस्टेल, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे.
१९) विजय रामफल भिल्लोड, वय – ४६ वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा. ठी. फारशी चाळ, देहूरोड रेल्वे स्टेशन, पुणे.
२०) सुरेश गणपत गारडे, वय-५४…
२१) राहुल प्रकाश जगधने, वय- ३४ वर्षे, धंदा जुगार खेळणारा, रा. ठी. शितोळे बिल्डींग, २३८९, न्यू मोदीखाना, पूना कॉलेज समोर, कॅम्प, पुणे.
२२) बापू कारभारी भोसले, वय ५२ वर्षे, धंदा – जुगार घेणारा कामगार/ रायटर, रा.ठी. सोमेश्वरवाडी, दळवी वीट भट्टी, औंध, पाषाण, पुणे.
२३) सुभाष श्रावण देवरे, वय – ४३ वर्षे, धंदा – जुगार खेळणारा, रा. ठी. अमृततुल्य हॉटेलचे मागे, पाटील इस्टेट, पुणे.
२४) गणेश विजयसिंग परदेशी, वय – ४५ वर्षे, धंदा – जुगार घेणारा, रा.ठी. ओमकार कॉलनी, विजय नगर, काळेवाडी, पिंपरी, पुणे.
२५) गोपाळ कुमार पारेकर, वय – २२ वर्षे, धंदा – जुगार घेणारा, कामगार/ रायटर, रा.ठी. ग्रीनफिल्ड सोसायटी, ए वींग, दुसरा मजला, साई मंदिर, कात्रज पुणे.
दुकान क्रमांक – ४.
साई प्रतिक लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स व खेळी यांची नांवे.
२६) नितीन विठ्ठल डोंगरे, वय – ५२ वर्षे, धंदा – जुगार मालक, रा.ठी. नागपूर चाळ, सर्व्हे नंबर १९१, अशोक जनरल स्टोअरचे शेजारी, येरवडा, पुणे-६.
२७) महेंद्र बाबू बेरी, वय ३२ वर्षे, धंदा – रायटर, रा. ठी. सर्व्हे नंबर १०, पर्णकुटी, येरवडा, पुणे – ६.
२८) रामदास दत्तात्रय खैरे, वय – ५७ वर्षे, धंदा- ऑनलाईन मटका रायटर, रा. ठी. १०५६/५७, भवानी पेठ, पुणे- ४२.
२९) सलीम रशीद शेख, वय-२५ वर्षे, धंदा – ऑनलाईन मटका रायटर, रा. ठी. ग्रीन हिल पार्क, कात्रज, पुणे.
३०) दर्शन गोलूराम साहू, वय-४३ वर्षे, धंदा – गवंडी, रा. ठी. नांदेड फाटा, नाल्याशेजारी, पुणे.
३१) सुशिल प्रेमानंद पवार, वय ४१ वर्षे, धंदा- नोकरी, जुगार खेळणारा, रा. ठी. ४३२, रास्ता पेठ, पुणे-११.
३२) धनंजय बाळासाहेब कानगुडे, वय- ३२ वर्षे, धंदा – ड्रायव्हर, जुगार खेळणारा, रा.ठी. हिंजवडी फेज वन, साखरे वस्ती, विठ्ठल मंदिरा शेजारी, चिंतामणी निवास, बी – ६५, पुणे.
३३) राजकुमार रामअजर सरोज, वय- २१ धंदा – कुक, जुगार खेळणारा, रा. ठी. बांबू हाऊस हॉटेल, शिवाजीनगर, पुणे.
३४) प्रकाश सारंधर कंकाळ, वय – ५५ वर्षे, धंदा- हमाली, जुगार खेळणारा, रा. ठी. रहाटणी, रामनगर, पुणे.
३५) राजेंद्र जगन्नाथ बेल्हेकर, वय-५३ वर्षे, धंदा- नोकरी व जुगार खेळणारा रा. ठी. नवी सांगवी, तालुका हवेली, जिल्हा पुणे.
३६) विलास मरीबुवा सरजे, वय- ३१ वर्षे, धंदा- नोकरी, जुगार खेळणारा, रा. ठी. बालाजी नगर, भोसरी पुणे.
दुकान क्रमांक ६.
जीपीएस लॉटरी सेंटर येथील ऑनलाईन मटका व अन्य जुगार घेणारे मालक, रायटर्स व खेळी यांची नांवे
३७) प्रवीण महादेव नगराळे, वय- ३१ वर्षे, धंदा – जीपीएस लॉटरी मालक, रा.ठी. शिक्षक सोसायटी, इंगोले नगर, पिंपळे निलख, पुणे.
३८) सिद्धू दत्तू गायकवाड, वय ३७ वर्षे, धंदा जुगार घेणारा कामगार/ रायटर. रा.ठी. मनोभूषण अपार्टमेंट, फ्लॅट नंबर ०४, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, पुणे.
घटनास्थळावरुन पळून गेलेले पाहीजे आरोपींची नावे
३९) साई प्रतिक लॉटरी सेंटर, दुकान नंबर ४ चा मालक नामे ज्ञानेश्वर बबन भगत, वय ५८ वर्षे, रा.ठी. मुंढवा, पुणे. (पुर्ण पत्ता माहीत नाही)
४०) शहा लॉटरी सेंटर, दुकान नंबर ५ चा मालक नामे मनोज शहा, (पुर्ण पत्ता माहीत नाही),
४१) ऑनलाईन लॉटरीचे मालक व बुकीज.
४२ ते ५५) दुकान नंबर ५ व ६ मधून पळून गेलेले एकूण १४ अनोळखी रायटर्स व खेळी, नांव व पत्ता माहित नाही.
सदर अटक/कारवाई करण्यात आलेल्या आरोपींकडून, (जुगार अड्डा मालक, रायटर, खेळी व पाहिजे असलेले अनोळखी व्यक्ती (पळून गेलेले) असे एकूण ५५ आरोपी) यांचेकडून व घटनास्थळावरुन एकूण रुपये ४,५५, ५८० रुपयांचा मुद्देमाल (त्यामध्ये रोख रु. ६६, ९८० तसेच १,८३,५०० किंमतीचे ३६ मोबाईल सेट्स व रु. २, ०५,१०० रुपयांचे जुगाराचे साहित्य) हस्तगत करण्यात आला आहे. सदर अटक/कारवाई केलेल्या आरोपी विरुद्ध शिवाजी नगर पोलिस स्टेशन येथे गु. र. क्र. १०७/२०२२, भा.दं.वि. कलम ४२० सह १२० (ब), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ अ, ५ तसेच इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम ६६ (क) व ६६ (ड) अ्न्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपट गृहासमोरील चौकात (पुणे महापालिका चौकात) रामसर बेकरी ते आलोक रेस्टॉरंट ॲंड बारचे दरम्यान असलेल्या व सध्या बंद पडलेल्या सिंध पंजाब हॉटेलच्या एकाच लाईनीतील एकूण सहा गाळ्यात स्वस्तिक लॉटरी सेंटर, स्टार लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई प्रतिक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर अशा वेगवेगळ्या नावाने सदरचा ऑनलाईन लॉटरीचे नावाखाली हे ऑनलाइन जुगार अड्डे सुरू करण्यात आलेले होते. सदर जुगाराचे अड्डे बाहेरुन पाहिले तर सर्व साधारण माणसाला ओळखू न येणारे असे आहेत.
सदर जुगार अड्ड्यांचे मुख्य प्रवेशद्वारांवर जाड कापडाचे गडद रंगाचे मळके पडदे लावलेले असून, त्यामुळे आत लाईट सुरू असला अथवा कितीही गर्दी झाली तरीही, बाहेरच्या व्यक्तीस आतले काहीच दिसत नाही किंवा ऐकू येत नाही. या जुगार अड्ड्याचे दुकानाबाहेर व आसपास या जुगार अड्ड्यावरचे शुटर्स (इंन्फॉर्मर्स) बसलेले असतात. ते बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीबाबत आतल्या व्यक्तीस मोबाईल वरुन माहिती पुरवत असत. पोलिस येणार असल्याची माहिती मिळाल्यास सर्व जुगारींना मागच्या दाराने पळवून लावून, शेजारच्या दुकानातून दिलेला विद्युत पुरवठा खंडित केला जातो. बाहेरच्या रस्त्यावर सतत प्रचंड वाहतूक असल्याने या जुगार अड्ड्याकडे खेळणारे सोडले तर इतरांचे सहसा लक्ष जात नाही.
याठिकाणी ऑनलाईन ॲपद्वारे व पांढऱ्या प्लास्टिक पेपर शीटवर जुगार खेळण्यात येतो. खेळींनी लावलेला आकडा एका पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक पेपरवर लिहला जातो. तो नंबर लक्षात ठेवण्यासाठी खेळी हा त्याचा मोबाईल मध्ये फोटो काढून घेतो. व काही क्षणातच या जुगाराचा ऑनलाईन निकाल लागतो. या ऑनलाईन जुगार प्रकारात जुगार अड्डा मालक, चालक, बुकीज, ॲपचा मालक व चालक यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे न वापरता संगणकावर ऑनलाईन व्यवहार करुन शासन महसूल बुडवून, राज्य सरकारची देखील फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, संदीप कर्णिक, पोलिस सह आयुक्त, रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे व श्रीनिवास घाटगे, पोलिस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाकडील व. पो. नि. राजेश पुराणिक, मपोउनि पंधरकर, मपोह मोहिते, मपोह शिंदे, मपोह पुकाळे, पोह कुमावत, पोना पोटे, पोशि भोसले, पोशि जमदाडे, पोना पठाण, पोना कांबळे यांच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे पोलिस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार सदर कारवाईत परीविक्षाधिन पोलिस उपनिरीक्षक यांचे एक पथकही सहभागी झाले होते.



