
(✍️मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे)
पुणे पोलीस दलातील सामजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरक्षकानी नागरिकांना लाथा बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण करत, अश्लील भाषेत शिवीगाळ करून पुन्हा एकदा नवा पराक्रम केला आहे. याची चर्चा सर्वत्र जोरदार सुरू असून. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या हैवानी कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव राजेश पुराणिक असे आहे. एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याला हे कृत्य अशोभनीय आहे. तसेच नागरिकाच्या मानवी हक्कांचे उल्लंघन तर आहेच. त्याचबरोबर सेवा नियमांचे सुध्दा गैरवर्तन आहे. हे सर्व या अधिकाऱ्यासाठी काही नवीन नाही. यांनी याच्या अगोदर सुद्धा पोलीस खात्यात मोठे – मोठे पराक्रम केलेत. पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांचे नवनवीन पराक्रम पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना का दिसत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. कर्तव्यदक्ष व जबाबदार अधिकाऱ्यांकडून एखादी नकळत चूक झाली असेल किंवा त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एखादा जुगार अड्डा निदर्शनास आल्यास त्यांच्याकडून लेखी स्वरुपात हमीपत्र लिहून घेतले जाते किंवा त्यांची उचलबांगडी नियंत्रण कक्षामध्ये करणारे पोलीस आयुक्त आता गप्प का? असाही प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना राजेश पुराणिक यांच्या मागील काळातील नवनवीन पराक्रमाची माहिती घेणे गरजेचे आहे.
आर्थिक गुन्हे शाखेत असताना राजेश पुराणिक यांनी २०१७ साली खर्चाची खोटी बिले सादर करणे, तपास निधीचा अपहार करणे, आधी कारणास्तव तत्कालीन कर्तव्यदक्ष पुणे पोलीस आयुक्त, रश्मी शुक्ला यांनी निलंबनाची कारवाई करत त्यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरू केली होती. समर्थ वाहतूक विभागात असताना व्यवसायिकाला धमकावून कानावर सर्व्हिस रि्हॉल्व्हर रोखणे, या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल आहे. तसेच समर्थ वाहतूक विभागात गाडी सोडवायला आलेल्या नागरीकांना उद्धटपणे बोलणे, मारहाण करणे, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, व त्यांचे मोबाईल फोडने, त्याचबरोबर मुंढवा येथील वॉटर बारमध्ये तरुणांना व कामगारांना मारहाण केली होती. एवढे सारे पराक्रम करून पोलीस आयुक्त या अधिकाऱ्यावर कुठलेही दंडात्मक कारवाई करायला उदासीन दिसत आहेत.
व्हिडिओ व्हायरल होऊन काही दिवस उमटले आहेत, पण पोलीस आयुक्त यांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नाही,
याप्रकरणी योग्य तो तपास करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आलेले आहेत.@ChakankarSpeaks @PuneCityPolice
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) August 13, 2022
राज्य महिला आयोगाने मात्र तात्काळ दखल घेतली आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना चौकशीचे निर्देश दिले. म्हणजे पोलीस आयुक्तांना उच्च स्तरावरून चौकशीचे निर्देश येणार नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त कुठलीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत का? असा प्रश्न जनतेला पडलेला आहे.
पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाचे वादग्रस्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांचा पुन्हा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पुराणिक हे बंद खोलीत एका व्यक्तीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना दिसून येत आहेत. पुराणिक यांच्याविरोधात यापूर्वी सुद्धा अनेकांनी तक्रारी दिलेल्या आहेत. विशेष बाब म्हणजे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे त्या पोहचल्या सुद्धा आहेत. मात्र, असं असून सुद्धा आयुक्त अमिताभ गुप्ता हे गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये पुराणिक हे बंद खोलीत एका नागरिकाला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचं दिसून येत आहेत.
@DGPMaharashtra
पुणे शहर पोलीस दलातील सामजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक हे नागरीकांना अमानुषपणे मारहाण करत अश्लील भाषेत शिवीगाळ करत आहेत. pic.twitter.com/xMmRAuH3ZW— Maharashtra Mitra (@Maharashtramitr) August 13, 2022
दरम्यान, यापूर्वी देखील राजेश पुराणिक यांनी हॉटेलमध्ये कारवाई करत असताना तरुणांना व कामगाराना मारहाण केल्याचं समोर आलं होतं. तर महिला पोलिसांनी तरुणींना मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तरी सुद्धा पुराणिक यांची ही मुजोरी सुरूच आहे.




