
(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
अवैध धंद्यावाल्यानो सावधान! सुरू कराल मटका, तर सामाजिक सुरक्षा विभाग देईल तुम्हाला झटका!
गेल्या मागील काही दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ठिकठिकाणी जोरदार कारवाई करून अवैध धंद्यावाल्यांना सळो की पळो करून सोडले होते. मात्र काही वादग्रस्त कारणामुळे तत्कालीन सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक हे कारवाई दरम्यान महिलांवरील अश्लील भाषेत शिवीगाळ करत नागरीकांना अमानुषपणे मारहाण करून मोठा पराक्रम केला होता. आणि याच पराक्रमामुळे त्यांना सामाजिक सुरक्षा विभागातून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पदभार स्वीकारला. आणि आपल्या धडाकेबाज कामगिरीचा पहिला नारळ लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लब वर कायदेशीर कारवाई करून फोडला, आता सामाजिक सुरक्षा विभागाचे बारकाईने लक्ष शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अवैध धंद्यावरती आहे. जर आपण लपून-छपून सुरू कराल मटका, तर सामाजिक सुरक्षा पथक लपून-छपून येऊन देणार बघा तुम्हाला कायदेशीर झटका.
त्यामुळे अवैध धंद्यावाल्यानो सावधान! सुरू कराल मटका, तर बसणार तुम्हाला फटका
पुणे : पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने खडकी बाजार परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा घातला आहे. या छाप्यामध्ये दहा जणांवर कारवाई करून, जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळुन ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. २७/०८/२०२२ रोजी मेहता बिल्डिंग जवळील सुभान अल्ला सायकल मार्ट समोरील सार्वजनिक रस्त्यावच्या कोपऱ्याला खडकी बाजार येथे लपून – छपून बेकायदेशीर मटका जुगार घेत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खातरजमा करून. सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीयरीत्या पाळत ठेवत सदर ठिकाणी छापा टाकत पैशावर मटका जुगार घेणारे व जुगार खेळणारे असे १० इसम मिळून आले. सदर प्रकरणी १० इसमांविरुद्ध खडकी पोलीस स्टेशन येथे गुरनं. १६५/२०२२ महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. व १० आरोपींना पुढील कारवाईसाठी खडकी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार , पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके , पोलीस अंमलदार संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, प्रमोद मोहिते, अजय राणे, अमित जमदाडे, महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केली आहे.




