महाराष्ट्रगुन्हेपुणे

आरोपीला क्लीन चीट देणे पडले महागात! पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि बारामतीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले आणि मोरगावचे माजी सरपंच पोपट तावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

(✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे)

बारामती : पुणे जिल्ह्यातील चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणी आरोपीला क्लीनचीट दिल्याप्रकरणी पोलीस उपायुक्तांसह चौघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पप्पदौंड न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि बारामतीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले आणि मोरगावचे माजी सरपंच पोपट तावरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मोरगाव येथील जमिनीच्या खरेदी विक्रीत फसवणूक केल्याचा आरोप अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या मोरगाव येथे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. यातील खरेदी विक्री प्रकरणात पोपट तावरे यांनी फसववणूक केली असल्याबाबतची तक्रार किरण शांताराम भोसले व आरती लव्हटे यांनी पोलिसांकडे केली होती.

राजकीय दबावातून आरोपीला क्लीन चीट ?

पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर राजकीय दबावामुळे यातील मुख्य आरोपी असलेल्या पोपट तावरे यास क्लीन चीट दिली होती. आणि या गुन्ह्यात त्यांचा सहभाग नाही असं न्यायालयास दर्शविले होते. परंतु पोपट तावरे हे खरेदीदार असतानाही त्याला बाजूला ठेवण्यासाठी संबंधित आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे न्यायालयात सादर केली. याबाबत फिर्यादींनी न्यायालयात दाद मागितली होती.

न्यायालयाकडून पोलिसांच्या कामावर ताशेरे

याबाबत दौंड येथील न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवले असून पोलीसांनी तावरे याला तीन गुन्ह्यातून निर्दोष सोडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच न्यायालयाने पोलिसांच्या कामावर ताशेरे ओढले आहेत.

चौघांवर गुन्हा दाखल

बारामतीचे तत्कालीन डीवायएसपी आणि पुण्याचे उपायुक्त नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले, पोपट तावरे यांच्यावर कलम 420, 464, 120 ब, 192, 196 अशा विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra