गुन्हेपुणे

पुणे सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू होता पत्त्याचा क्लब, १० जनांवर कारवाई

(✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे)

पुणे : पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी जुगार घेणारे आणि खेळणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतले आहे.

बुधवार दि.२४/०८/२०२२ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माळीमळा, गायकवाड वस्ती, लोणी काळभोर, पुणे येथे बेकायदेशीरपणे पत्त्याचा जुगार खेळत व खेळवत आहेत. अशी खात्रीशीर माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे अंमलदार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत मिळाली होती.

सदर ठिकाणी पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनीयता पाळत ठेवत छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम खुलेआम बेकायदेशीर पणे ५२ पत्यांचा रमी हा जुगार पैशांवर खेळत असल्याचे निदर्शनात आल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे १० इसम ताब्यात घेऊन. सदर ठिकाणाहून १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेल्या जुगाऱ्यांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

१) लक्ष्मण संभाजी जगताप ( वय ६० वर्षे), रा. माळीमळा, अहिल्यादेवी शाळेजवळ, लोणी काळभोर, पुणे

२) मंगेश कुंडलीक शिंदे (वय २७ वर्षे) रा. माळीमळा, लोणी काळभोर, पुणे

३) मल्हारी पोपट शिंदे (वय २६ वर्षे) रा. सातववाडी, हडपसर पुणे

४) सचिन उत्तम मालपानी (वय ३५ वर्षे) रा. लोणीगांव, ननवरे चाळ, लोणी काळभोर, पुणे

५) राहुल बाबासाहेब गायकवाड (वय ४० वर्षे ) रा. कोलवाडी, ता. हवेली जि. पुणे

६) शकिल अहमद शेख (वय ३५ वर्षे) रा. लोणी स्टेशन, लोणी काळभोर, पुणे

७) अन्सर अली झीया उद्दीन कोरबु (वय ४५ वर्षे) रा. लोणी स्टेशन, लोणी काळभोर, पुणे

८) अक्षय बळीराम यलगुंडे (वय ३३ वर्षे) रा. टेलिफोन एक्सचेंज कॉटर्स, लोणी काळभोर, पुणे

९) संदीप रामचंद्र लांडगे (वय ३३ वर्षे) रा. घोरपडेगाव, पुणे

१०) परमेश्वर गोविंद कुसाळकर (वय ३४ वर्षे) रा. माळीमळा लोणी काळभोर, पुणे,  असे अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त, अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे, श्रीनिवास घाडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक, श्रीधर खडके, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra