पुणेसामाजिक

पुणे : शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती विवेक देसाई (वय ५०) यांचे रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.

स्वाती देसाई यांनी जवळपास २५ हून अधिक वर्षे पोलीस दलात सेवा बजावली आहे.

देसाई यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्‍यातील गणेशवाडी हे देसाई यांचे मूळ गाव. फेब्रुवारी १९९६ मध्ये त्या सरळसेवा अंतर्गत पोलिस अधिकारी झाल्या. त्यानंतर त्यांनी पुणे शहर पोलिस दलात नियंत्रण कक्ष, आर्थिक गुन्हे शाखा, सहकारनगर पोलिस ठाणे यासह गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) येथेही सेवा बजावली होती. काही काळ त्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) प्रतिनियुक्तीवर काम केले होते. सहकारनगर पोलिस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गंभीर व किचकट गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra