
(✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे)
पुणे : बंडगार्डन पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत, पुणे शहरातील प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा करेक्ट बंदोबस्त केला आहे. पुणे शहरातील भयभीत होऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मात्र या कारवाईनंतर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
इसम नामे श्रेयस श्रीपाद चांडोळकर, वय-२० वर्षे, धंदा – शिक्षण, रा. टिंगरे नगर, पुणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील कलेक्टर ऑफिस जवळील बस स्टॉप वर उभे असताना त्यांनी त्यांच्या मित्राला फोन करण्यासाठी मोबाईल फोन हातामध्ये घेऊन, मोबाईल नंबर शोधत असताना त्यांच्या पाठीमागून अचानक प्रवाशांच्या गर्दीतून दोन अनोळखी इसम आले, त्यातील एकाने त्यांना धक्का मारला व दुसऱ्या इसमाने फिर्यादी यांना काही समजण्याच्या आतच त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेऊन ते दोघेही इसम सेंट्रल बिल्डिंगच्या दिशेने गर्दीतून पळून गेले, याबाबत त्यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून दिनांक ०७/०७/२०२२ रोजी दोन चोरट्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु. र. नं.१८१/२०२२ भादवी. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांनी सांगितलेल्या वर्तनाच्या चोरट्याचा बंडगार्डन पोलीस ठाण्याचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे टेशन परिसरात शोध घेत असताना, दाखल गुन्ह्यातील आरोपी हे दस्तूर स्कूल जवळील गल्लीत असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदर आरोपींना सापळा लावून जागीच पकडून बंडगार्डन पोलीस ठाणे येथे घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव १) दीपक गणेश गायकवाड, वय ४३ वर्षे, रा. केशेव नगर मुंढवा, २) शहाबाज उर्फ सैफन रज्जाक शेख, वय ३० वर्षे, रा. सय्यद नगर, हडपसर, सध्या रा. रामटेकडी, हडपसर, ३) आदर्श नारायण गायकवाड वय ३१ वर्षे, रा. मुंढवा असे असल्याचे सांगून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने, त्यांना गुन्ह्यात अटक करून, त्यांचे अंगझडती व घरझडती मध्ये एकूण चोरीचे ३० मोबाईल फोन मिळून आल्याने, आरोपी क्रमांक. १ याकडे सखोल तपास केला असता त्याने त्यांच्या साथीदारांच्या मदतीने बंडगार्डन पोलीस ठाणे १) गु. र. नं. १८१/२०२२ भादवि कलम ३७९,३४ २) गु. र. नं. १८८/२०२२ भादवि कलम १७९,३४, ३) गु. र. नं. १८९/२०२२ भादवि कलम ३७९,३४, ४) गु. र. नं. १९३/२०२२ भादवि कलम ३७९,३४, ५) गु. र. नं. २०५/२०२२ भादवि कलम ३७९,३४ तसेच पुणे रेल्वे स्टेशन १) गु. र. नं. १९७/२०२२ भादवि कलम ३७९,३४ २) गु. र. नं. २६७/२०२२ भादवि कलम ३७९,३४, ३) गु. र. नं. ३११/२०२२ भादवि कलम ३७९,३४ व अंबरनाथ पोलीस स्टेशन गु. र. नं. ५२/२०२२ भादवि कलम ५०६(२), मपोका कलम ३७ (१)१३५ प्रमाणे असे ९ गुन्हे उघडकीस आणून चोरीचे तब्बल २,०५,०००/- रुपये किमतीचे ३० महागडे मोबाईल फोन हस्तगत करण्यात असुन, सदरचे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ २, सागर पाटील, सपोआ लष्कर विभाग, पुणे आर. एन. राजे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंडगार्डन पोलिस स्टेशन पुणे प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बंडगार्डन पोलिस स्टेशन पुणे अश्विनी सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राहुल पवार, सपोफौ. मोहन काळे, नितीन जगताप, सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, अमोल सरडे, सागर घोरपडे, संजय वणवे, किरण तळेकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, सतिश मुंडे यांनी केली आहे.




