कृषी

नाशिक : लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीची राज्यात प्रथम क्रमांकाने निवड

नाशिक : जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीची राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

राज्यात जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे हा एक प्रमुख घटक आहे. त्याअंतर्गत बाजार समितीच्या वार्षिक कामगिरीच्या आधारावर मुल्यांकन करून राज्यभरातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे अपेक्षित होते. त्यानुसार पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) यांच्यामार्फत बाजार समित्यांमधील पायाभूत व इतर सेवा-सुविधा निकषांसाठी ८० गुण, आर्थिक निकषांसाठी ३५ गुण, वैधानिक कामकाज निकषांसाठी ५५ गुण व इतर निकषांसाठी ३० गुण असे एकूण २०० गुण निश्चित करण्यात आले होते.

त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने ठरवून दिलेल्या गुणांकनानुसार लासलगांव बाजार समितीच्या सन २०२१-२२ या वर्षाच्या वार्षिक कामगिरीची पहाणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, निफाड यांच्या कार्यालयाने करून वस्तुनिष्ठ गुणांकनाचा प्रस्ताव पणन संचालनालयातील स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षास सादर केला होता. त्याप्रमाणे प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने सदर प्रस्तावाची छाननी करून सन २०२१-२२ या वर्षाच्या वार्षिक क्रमवारीत लासलगांव बाजार समितीस एकूण २०० गुणांपैकी १६३ गुण देऊन राज्यस्तरीय क्रमवारीत प्रथम क्रमांक दिलेला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra