
(✍️मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
पुणे : प्रियकराने प्रेयसीची सुपारी देत तिची हत्या केली असल्याचं उघड झालंय. तब्बल ४ लाख रुपये एडव्हान्स पैसे देऊन आपल्याच प्रेयसीचा खून घडवून आणणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या खळबळजनक हत्याकांड प्रकरणाचा उलगडाही पोलिसांनी केला आहे. ९ ऑगस्ट रोजी हत्येची ही घडना उघडकीस आलेली होती. धारदार शस्त्राने वार करत या महिलेचा खून करण्यात आलेला होता. प्रियकराने प्रेयसीचा फोटो दाखवून तिला संपवा, असं म्हणत तिच्या हत्येची सुपारी दिली होती. चार लाख रुपयांची रोख रक्कमही त्यासाठी देण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय.
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे हे खळबळजनक हत्याकांड ९ ऑगस्ट रोजी घडलं होतं. गुन्हे शाखेने या हत्याकांडाची उकल केलीय. मुख्य आरोपीसह इतर तिघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या सगळ्यांच्या चौकशीतून हत्येचा कट रचण्यापासून ते हत्या करण्यापर्यंतचा थरारक घटनाक्रमही समोर आलाय.
बजरंग तापडे याचे एका महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधातून महिलेनं बजरंग याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. लग्नासाठी हट्ट धरलेल्या महिलेला बजरंग याने नकार दिला. लग्नासाठी नकार देऊनही महिलेनं बजरंगला लग्न करण्यासाठी वारंवार विचारणा केली होती. अखेर वैतागून प्रेयसीला संपवण्याचाच निर्णय बजरंगने घेतला. त्याने आपल्या प्रेयसीचा फोटो जवळचा मित्र पाडुंरंग हारके याला दिला आणि तिच्या हत्या करण्यासाठी सुपारी दे, असं सांगितलं. यासाठी सात लाख रुपये देण्याचंही बजरंग याने मंजूर केलं.
बंजरंगचा मित्र पांडुरंग हारके यांना त्याच्या ओळखीच्या गुन्हेगार मित्राशी संपर्क साधला. गुन्हेगार प्रवृत्तीचा असलेल्या सचिन थिगळे याला बोलावून त्याला बजरंगच्या प्रेयसीचा फोटो दिला आणि तिची हत्या करण्यास सांगितलं. यासाठी त्याने चार लाख रुपये एडव्हानसही दिला. अखेर ९ ऑगस्टला बजरंगच्या प्रेयसीची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी बजरंग तापडे, त्याचे साथीदार पांडुरंग उर्फ सागर हारके, सचिन थिगळे, सदानंद तुपकर अशा एकूण चौघांना पोलीसांनी अटक केली आहे.



