गुन्हेपुणे

७ वर्षांच्या मुलीचं अपहरण करून, बलात्कार आणि हत्या! पुण्याच्या मावळ तालुक्यातील घळबळजनक घटना, नराधमाला अटक

पुणे : पुणे जिल्हा बलात्कार आणि हत्येच्या घटनेनं पुन्हा एकदा हादरला आहे. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात काळीज हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.

एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. इतकंच नाही, तर नंतर या सात वर्षांच्या मुलीची हत्यादेखील करण्यात आली. या घटनेमुळे मावळ तालुक्याचं संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी पोलिसांनी या घटनेबाबातची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटकही करण्यात आलीय. या नराधमाची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे. १० ऑगस्टपर्यंत या नराधमाला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मंगळवारी एक सात वर्षांची चिमुरडी बेपत्ता झाली होती. घरातूनच या मुलीचं अपहरण करण्यात आलेलं होतं. या मुलीचा शोध घेतला जात असतानाच आता समोर आलेल्या खळबळजनक घटनेनं सगळ्यांचा मोठा धक्का बसलाय.

नराधमाला अटक

अपहरण, बलात्कार आणि हत्या अशा तीन गुन्ह्यांखाली २४ वर्षांच्या तेजस दळवी नावाच्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. कामशेत पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. सात वर्षांच्या चिमुरडीचं तेजसने तिच्या घरातूनच अपहरण केलं होतं. घरातून या चिमुरडीला पळवून नेल्यावर तेजसने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा खूनही केला. मंगळवारपासून ही चिमुरडी बेपत्ता होती. तिचा मृतदेह हाती लागल्यानंतर पोलिसांनी तो पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला होता. त्यानंतर पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा करण्यात आला.

पोस्ट मॉर्टेमधून धक्कादायक खुलासा

सात वर्षांच्या चिमुरडीची हत्या करण्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, याचा खुलासा पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून झाला. त्यानंतर पोलिसांनी हत्येसोबत बलात्काराचाही गुन्हा नोंदवून घेतला आहे. यानंतर पोलिसांनी लगेचच नराधम आरोपीविरोधात अटकेची कारवाई केली. आरोपी तेजस दळवी याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. १० ऑगस्टपर्यंत तेजस दळवीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सध्या कामशेत पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असून नराधमाची कसून चौकशी पोलिसांकडून केली जातेय.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra