महाराष्ट्रपुणेराजकारण

Maharashtra Police : राज्य पोलीस दलात मोठा खांदेपालट; पुणे, नाशिक, नवी मुंबईसह अनेक शहरातील पोलीस आयुक्तांची बदली

राज्य पोलीस दलातील तब्बल ३० वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

पुणे – राज्य पोलीस दलातील तब्बल ३० वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत. त्यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची देखील बदली झाली आहे. पुण्यात सीआयडी प्रमुख आणि अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पदोन्नतीने बदली झालेल्या अधिकार्‍यांची नावे व त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे – 

१) संजय मोहिते (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई ते विशेष महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयात)

२) नवीनचंद्र रेड्डी (अप्पर आयुक्त, नागपूर शहर ते पोलीस आयुक्त, अमरावती शहर)

३) आरती सिंह (पोलीस आयुक्त, अमरावती शहर ते अप्पर आयुक्त, सशस्त्र पोलीस, बृहन्मुंबई)

४) नामदेव चव्हाण (अप्पर पोलीस आयुक्त, पुणे शहर ते उप महानिरीक्षक, सीआयडी, पुणे)

५) निसार तांबोळी (उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड ते अप्पर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहमुंबई)

६) ज्ञानेश्वर चव्हाण (अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ते अपर आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई)

७) रंजन कुमार शर्मा (उप महानिरीक्षक, सीआयडी ते अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई)

८) सदानंत दाते (पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार ते अप्पर महासंचालक, एटीएस, मुंबई)

९) विश्वास नांगरे-पाटील (सह पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर पोलीस महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन, विनय कुमार चौबे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)

१०) मिलिंद भारंबे (आयजी, लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर, महाराष्ट राज्य, मुंबई ते पोलीस आयुक्त, नवी मुंबई)

११) राज वर्धन (सह पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई ते अप्पर पोलीस महासंचालक, नि-सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई)

१२) विनय कुमार चौबे (अप्पर पोलीस महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड)

१३) अमिताभ गुप्ता (पोलीस आयुक्त, पुणे शहर ते अप्पर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, महाराष्ट राज्य, मुंबई)

१४) निकेत कौशिक (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते अप्पर पोलीस महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन, महाराष्ट्र राज्य, मुंबई. प्रभात कुमार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)

१५) शिरीष जैन (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)

महेश पाटील, विनित अगरवाल, बिपिन कुमार सिंह, देवेन भारती, प्रभात कुमार यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

 

बदलीने पदस्थापना करण्यात आलेल्या अधिकार्‍यांची नावे आणि पुढील कंसात कोठुन कोठे याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे – 

१) एस. जयकुमार (आयजी, प्रशासन ते पोलीस सह आयुक्त, प्रशासन, बृहन्मुंबई)

२) अंकुश शिंदे (पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड ते पोलीस आयुक्त, नाशिक शहर)

३) प्रवीण पवार (संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे ते आयजी, कोकण परिक्षेत्र, कोकण)

४) सुनिल फुलारी (आयजी, मोटर परिवहन, पुणे ते आयजी, नाशिक परिक्षेत्र, नाशिक)

५) अनिल कुंभारे (अप्पर आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई ते अप्पर आयुक्त, मध्य प्रादेशिक, बृहन्मुंबई)

६) परमजीत दहिया (उप महानिरीक्षक, एटीएस ते अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई)

७) विनायक देशमुख (अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ते अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई)

८) राजीव जैन (अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई ते अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, बृहन्मुंबई)

९) रितेश कुमार (अप्पर पोलीस महासंचालक, सीआयडी ते पोलीस आयुक्त, पुणे शहर)

१०) मधुकर पांडे (अप्पर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार)

११) प्रशांत बुरडे (अप्पर महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा, मुंबई ते अप्पर पोलीस महासंचालक, सीआयडी, महाराष्ट्र राज्य, पुणे)

१२) सत्यनारायण चौधरी (विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलीस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, बृहन्मुंबई)

१३) निशित मिश्रा (आयजी, एटीएस, मुंबई ते पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई)

१४) प्रवीण पडवळ (सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई ते पोलीस सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई)

१५) लखमी गौतम (आयजी-आस्थापना ते पोलीस सह आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई)

विरेंद्र मिश्रा, संजय दराडे, बी.जी. शेखर, जयंत नाईकनवरे, राजकुमार व्हटकर व सुहास वारके यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra