पर्यटन

पिंपरी चिंचवड ते देऊळगाव कोळ ”जिजाऊ एक्‍सप्रेस’ ही नवीन एसटी बस सुरू

पिंपरी – वल्लभनगर आगाराच्या वतीने खास प्रवाशांच्या मागणीनुसार शनिवारपासून (दि. 6) पिंपरी चिंचवड ते देऊळगाव कोळ अर्थात जिजाऊ एक्‍सप्रेस ही नवीन एसटी बस सुरू केली. वल्लभनगर आगारातून दुपारी 1 वाजता ही बस देऊळगाव कोळकडे मार्गस्थ झाली. आमदार महेश लांडगे यांनी एसटी बसला झेंडा दाखविला. या वेळी विभाग नियंत्रण रमाकांत गायकवाड, आगाराच्या सहाय्यक वाहतूक अधीक्षक पल्लवी पाटील आदी उपस्थित होते. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रण रमाकांत गायकवाड यांनी केले आहे. वल्लभनगर आगारातून रोज दुपारी 1 तर देऊळगाव कोळ येथून रोज सकाळी 7 वाजता जिजाऊ एक्‍स्प्रेस एसटी बस पिंपरी चिंचवडकडे निघणार आहे. रोज एक फेरी होईल. ही बस पिंपरी चिंचवड, शिवाजीनगर, शिरूर, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, देऊळगाव राजा, शिंदखेड राजा, किनगाव राजा, राहेरी, दुसरबीड, मलकापूर पांगरा, झोटींगा मार्गे देऊळगाव कोळला पोहोचणार आहे. प्रवाशांच्या मागणीस्तव ही सेवा सुरू करण्यात आली आहे.या एसटी बससाठी ऑनलाइन रिझर्व्हेशनची सुविधाही आहे. प्रवाशांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पल्लवी पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra