गुन्हेपुणे

पिंपरी-चिंचवड मध्ये सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, २६ जणांना अटक; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी याची खातरजाम केली आणि त्यानुसार मंगळवारच्या रात्री सापळा रचला. एका मागोमाग एक असे २६ खेळी कंपनीत दाखल झाली. बघता-बघता पत्ते पीसून झाली, सर्वांच्या हातात पत्ते पडू लागली, कडकं नोटांची बंडलं फुलांसारखी खुलू लागली, पैसै जिंकणारी आनंदीत झाली, तर पैसै हारणारी चक्क डोक्याला हात लावून खाली बसली. तितक्यात पोलिसांनी तिथं छापा टाकला आणि सर्वानाच धक्का बसला.

(श्री. नरसिंग कांबळे – ✍️ मुख्य संपादक)

पुणे (पिंपरी-चिंचवड) : देहूगाव येथे कंपनीच्या ईमारतीमध्ये सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर (पत्याच्या क्लबर) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने छापा टाकून मोठा जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.२) रात्री २ च्या सुमारास देहूगाव ते येलवाडी मार्गावरील एच.एच.ई.पी.एल. हेवी इंडस्ट्रियल फैब्रिकेशन लिमिटेड देहूगाव, या कंपनीच्या पाहिल्या मजल्यावर करण्यात आली. हि करवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले, पोलीस उपनिरीक्षक श्री. मंगेश भांगे व पोलीस अंमलदार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की देहूगावतील एच.एच.ई.पी.एल. हेवी इंडस्ट्रियल फैब्रिकेशन लिमिटेड. या कंपनीच्या गेटच्या आतमध्ये असलेल्या इमारतीमध्ये काही जण तीन पत्ती जुगार (पत्याचा क्लब) पैशावर खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी याची खातरजाम केली आणि त्यानुसार मंगळवारच्या रात्री सापळा रचला. एका मागोमाग एक असे २६ खेळी कंपनीत दाखल झाली. बघता-बघता पत्ते पीसून झाली, सर्वांच्या हातात पत्ते पडू लागली, कडकं नोटांची बंडलं फुलांसारखी खुलू लागली, पैसै जिंकणारी आनंदीत झाली, तर पैसै हारणारी चक्क डोक्याला हात लावून खाली बसली. तितक्यात पोलिसांनी तिथं छापा टाकला आणि सर्वानाच धक्का बसला. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून कोणालाच निसटता आलं नाही. पोलिसांनी सर्वांची माहिती घ्यायला सुरुवात केली. तेंव्हा पोलिसांना ही धक्का बसला. कारण या २६ जणांमध्ये शेखर गुलाब परंदवाड (वय-५० रा. माळवाडी, देहूगाव) व देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे ही जुगार खेळत होते. त्यांच्यासह देहू नगरपरिषदेचे नगरसेवक मयूर टिळेकर, एका नगरसेविकेचे पती विशाल परदेशींचा ही समावेश आहे. अटकेत असलेल्या २६ जणांकडून पोलिसांनी ५ लाख ३३ हजार ६१० रुपये रोख रक्कम, १ क्रेटा कार, १ स्विफ्ट कार, १८ दुचाकी वाहने, २७ मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण ३५ लाख १० हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व आरोपींवर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडाकेबाज कामगिरी पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्त – अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त – डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे – डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 – पद्माकर घनवट, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अंमलदार प्रवीण कांबळे, आशिष बनकर, राजेश कौशल्ये, प्रविण माने, गणेश कोकणे, गुन्हे शाखा युनिट ५ कडील धनराज किरनाळे, गणेश मालुसरे, संदिप ठाकरे, सावन राठोड, दत्तात्रय बनसोडे, नितीन बहिरट, शामसुंदर गट्टे व दयानंद खेडकर यांच्या पथकाने केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra