क्रीडाराष्ट्रीय

ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी, डॉक्टरांच्या ‘या’ माहितीमुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला होता. ३० डिसेंबरला ही घटना घडली होती. जखमी ऋषभ पंतला तात्काळ डेहरादूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून ऋषभ पंतवर उपचार सुरु आहेत. ऋषभ पंतची प्रकृती आता स्थिर असून सुधारणा होत आहे. ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती देताना सांगितलं की, त्याला आयसीयूमधून खासगी वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. पाच डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. तसेच ऋषभ पंतही उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या मणक्याचे आणि मेंदूचे सीटी स्कॅन आणि एमआरआय अहवाल सामान्य आहेत. मात्र, त्याच्या घोट्याला, टाचांना आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. हाडात कोणतेही मोठे फ्रॅक्चर झालेले नाही. बीसीसीआयचे डॉक्टर मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती आहे . ऋषभ पंतच्या पायाच्या लिगामेंटवर उपचार कुठे होणार? याबाबतचा निर्णय बीसीसीआय घेणार आहे. लिगामेंटवर उपचार केल्यानंतर व्यवस्थित होण्यासाठी दोन ते सहा महिने लागू शकते. यामुळे जवळपास ६ महिने ऋषभ पंत क्रिकेटपासून लांब राहण्याची शक्यता आहे. भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज आणि आयपीएल २०२३ खेळता येणार नाही, असंच चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra