गुन्हेपुणे

मुंढवा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी! जन्मदात्या आईचे तब्बल नऊ तुकडे करून नदीत फेकणाऱ्या मुलाला व नातवाला ठोकल्या बेड्या

(✍️मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)

पुणे : पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घडना उघडकीस आली आहे. पोटच्या मुलानेच नातवाच्या मदतीने आईचा खून केलाय. पुण्यामधील मुंढवा येथे घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय. जन्मदात्या आईने आपले घर खाली करावे या क्षुल्लक कारणावरून एका राजकीय पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्याने चक्क आईचा खून केला. तिच्या मृतदेहाचे तब्बल नऊ तुकडे केले. हे नऊ तुकडे त्याने मुळा मुठा नदीत फेकून दिले. वेगवेगळ्या ठिकाणी हे मृतदेहाचे अवशेष फेकून दिले.

उषा गायकवाड (वय-६२) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव

मुलगा संदीप गायकवाड व नातू साहिल संदीप गायकवाड असे आहे. मृत महिला ह्या देहू रोड आर्मी कॅम्पमध्ये कामाला होत्या. आपल्या आईच्या दागिन्यांवर आणि तिच्या नावावर असलेल्या घरावर मुलगा आणि नातवाचा डोळा होता. त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आजी दुपारी झोपेत असताना नातवाने तिच्यावर धारदार कटरने वार करत तिची हत्या केली. आपल्याच आईचे नऊ तुकडे करणारा मुलगा संदीप गायकवाड व याचाच लाडका मुलगा साहिल संदीप गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास मुंढवा पोलिसांकडून केला जातोय. ३० ऑगस्ट रोजी मुलगा संदीप गायकवाड याला अटक करण्यात आली होती. तर २८ ऑगस्टला नातु साहिल संदीप गायकवाड याला अटक करण्यात आली होती. मुंढवा येथील केशव नगरमध्ये राहणाऱ्या उषा गायकवाड ह्या ५ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. अखेर त्यांच्या शरीराचे काही तुकडे एकत्र करन्यात मुंढवा पोलिसांना यश आले आहे.

हत्त्या कशी झाली ? 

क्राइम पेट्रोल व दृश्यम चित्रपट पाहून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या संदीप गायकवाड यांच्या वीस वर्षीय मुलाला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ५ ऑगष्ट रोजी हा सर्व प्रकार घडला असून पोलिसांनी मृतदेहाचे काही तुकडे ताब्यात घेतले आहेत. आरोपीने आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तब्बल नऊ तुकडे वेगवेगळ्या पिशवीत भरुन मुळा-मुठा नदीत फेकून दिले.

पोलिसनी दिलेल्या माहितीनुसार

मयत वृद्ध महिला ही देहुरोड येथील शासकीय देहूरोड आर्मी कॅम्प कार्यालयात माळीकाम करत होती. तर मृत पतीही वानवडी परीसरातील शासकीय कार्यालयात माळीकाम करत होते. या कामातून मिळणाऱ्या पैशातून पिडीत महिलेने मुंढवा परिसरात दीड गुंठे जागा खरेदी करत तिथे घर बांधले होते. पिडीत महिलेला तीन मुली व दोन मुले असा परिवार होता. या प्रकरणातील संशयित आरोपी मुंढवा येथे राहण्यास आहे. घर खाली करावे यासाठी गेल्या काही दिवसांपासूनन, मुलाने आणि त्याच्या कुटुंबियांनी आईकडे तकादा लावला होता. आरोपी आईला त्रासही देत होता. ऑगस्ट महिण्याच्या पहिल्या आठड्यात घर खाली करावं यासाठी मुलगा व त्याचे कुटुंबिय मारहाण करत असल्याची तक्रार महिलेने मुलीकडे केली होती. याबाबत कळताच मुलगी पाच ऑगस्ट रोजी महिलेच्या घरी गेली. मात्र तिथे आई नसल्याने भावाकडे आणि त्याच्या मुलाकडे याबाबत चौकशी केली. मात्र दोघांनीही दमदाटी करुन मुलीला व तिच्या नवऱ्याला हाकलून दिले. घरातून बाहेर पडतांना मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याचे दिसून आल्याने मुलीला काही तरी घडल्याची शंका आली. यासंदर्भात मुलीने नातेवाईक व घराजवळी लोकांकडे अधिक चौकशी केली. त्यानंतर मुलीने मुंढवा पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात मुलाने साठ वर्षीय जन्मदात्या आईचाच खून करुन तिच्या मृतदेहाचे तब्बल नऊ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. पोलिसांनी आरोपीच्या आईच्या मृतदेहाच्या नऊ तुकड्यापैकी काही तुकडे विविध ठिकाणाहून पिशवीसह ताब्यात घेतले आहेत. तर उर्वरीत तुकडे शोधण्याचे काम युध्दपातळीवर चालू आहे. काही नागरीकांनी नदीपात्रात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे दिसून आल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी ते ताब्यात घेतले. दरम्यान, दोन्ही मांजरी गावांना जोडणाऱ्या नदी पात्रावरील पुलावरुन मृतदेहाच्या पिशव्या नदीत टाकल्याची कबुली या प्रकरणातील संशयित आरोपी संदीप गायकवाड व त्याच्या मुलागा साहिल संदीप गायकवाड यांनी पोलिसांना दिली आहे.

यांनी केली सदरची ही उत्कृष्ट कामगिरी

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, गुन्हे निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश मराठे, संतोष जगताप, वैभव मोरे, राजू कदम, महेश पाठक, योगेश गायकवाड, नीलेश पालवे, दिनेश भांदुर्गे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra