गुन्हेपुणे

पुणे हादरलं! पुणे रेल्वे स्थानकात हैवानी कृत्य, सात वर्षाच्या मुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण

(✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे)

पुणे : वडिलांना जेवणाचा डबा देऊन परतणाऱ्या मुलीवर एका अज्ञात व्यक्तीकडून अतिप्रसंग केला आहे. एका सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आले आहे.
या घटनेनं संपूर्ण पुणे हादरुन गेलंय. पुणे रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ माजली असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरात सात वर्षांच्या चिमुकलीचे वडील चहा विक्रीचा स्टॉल चालवतात. ही मुलगी वडिलांना जेवणाचा डबा द्यायला गेली होती. त्यावेळी डबा देऊन परतत असताना एकाने या मुलीला रेल्वे प्लॅटफॉर्मवरील रुममध्ये नेलं आणि तिथं तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरोधात सध्या पोलिसांनी पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास केला जात आहे. मात्र या घटनेमुळे राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
पुणे स्थानकात हैवानी कृत्य
पुणे रेल्वे स्थानकातील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचं वृत्त समोर आल्यानं एकच संताप व्यक्त केला जातोय. चहाविक्री करणाऱ्या आपल्या वडीलांना जेवणाचा डबा द्यायला एक सात वर्षांची मुलगी गेली होती. वडीलांना डबा देऊन ती परतत असताना. त्यावेळी एका अज्ञात आरोपीनं या मुलीचं अपहरण केलं.
सात वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिला या नराधमाने पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६, जवळ असलेल्या एका खोलीत घेऊन गेला. याच खोलीमध्ये नराधम आरोपीने हैवानी कृत्य करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन आता पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या अज्ञात आरोपीविरोधात तपास केला जात आहे. पुणे रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्हीचीही आता पडताळणी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आणि स्थानिक खबऱ्यांच्या साथीने आता आरोपीच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं टाकलंय. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वासही पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra