
✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे
अहमदाबाद : गुजरातमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. 500 जण नदीत पडले आहे. गुजरातच्या मोरबी यथे ही मोठी दुर्घटना घडली आहे. मोरबीतील मच्छू नदीवर असणारा केबल ब्रिज अचानक कोसळला आहे.
Gujarat | A cable bridge collapsed in the Machchhu river, Morbi area today. Several people fear injured. Further details awaited. pic.twitter.com/OZrDTxCWqx
— ANI (@ANI) October 30, 2022
त्यामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेत जवळपास ५०० जणांचा जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या पुलावर ५०० जण असल्याची माहिती समोर आली होती. देशभरात सध्या छटपुजेचा उत्साह आहे. छटपुजेनिमित्त मोठ्या संख्येने लोक या ब्रिजवर उपस्थित होते.
#WATCH | Several people feared to be injured after a cable bridge collapsed in the Machchhu river in Gujarat's Morbi area today. Further details awaited. pic.twitter.com/hHZnnHm47L
— ANI (@ANI) October 30, 2022
या उत्साहादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे आनंदावर विरझन पडलं आहे. पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुलावर ५०० जण होते. पण पूल कोसळल्यानंतर नेमके किती जण नदीत वाहून गेले याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या घटनेमुळे मोठी जीवीतहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे. नदीत वाहून गेलेल्या नागरिकांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. नदीत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत केले दु:ख व्यक्त
મોરબીમાં ઝૂલતો પુલ તૂટવાની દુર્ઘટનાથી અત્યંત વ્યથિત છું. તંત્ર દ્વારા રાહત અને બચાવની કામગીરી ચાલુ છે. ઇજાગ્રસ્તોને સત્વરે સારવારની વ્યવસ્થા માટે તંત્રને સૂચના આપી છે. આ સંદર્ભે જિલ્લાતંત્ર સાથે સતત સંપર્કમાં છું.
— Bhupendra Patel (@Bhupendrapbjp) October 30, 2022
या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, “मोरबीमध्ये केबल पूल कोसळल्यामुळे दुर्घटना झाली आहे, याचं मला दु:ख वाटत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेहण्याचं काम सुरु आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनासोबत संपर्कात असून बचावकार्य आणि दुर्घटनेची माहिती घेत आहे.”




