राजकारण

संगमनेरचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची अखेर बदली, सर्वसांमान्यावर करायचे खोटे गुन्हे दाखल ?

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)

संगमनेर : संगमनेर आणि श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा चौकशी आणि कसुरी गोपनीय अहवाल आणि पोलीस अधीक्षकांच्या चौकशी आदेशांच्या अनुषंगाने संगमनेरचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची आज तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांच्याकडे शहराचा प्रभारी चार्ज देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हे आदेश बजावले आहेत.

२०२२ दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. शहरातील अवैध व्यवसाय, जुगार, मटका अड्डे तसेच सातत्याने होणाऱ्या गोवंश कत्तली, राजकीय दबावाखाली येऊन विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे या सर्वच बाबींच्या तक्रारी पोलीस अधीक्षकांपासून थेट गृहमंत्र्यांपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत करण्यात आल्या होत्या. मात्र, देशमुख यांची बदली करण्यात येत नव्हती.

विविध प्रकारचे तक्रार अर्ज, तसेच चौकशीची मागणी, आंदोलनाचे इशारे यामुळे देशमुख यांची विभागीय चौकशी सुरू होती. नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेश काढला असून, देशमुख यांची बदली नगर येथे नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे आदेशाप्रमाणे पोलीस नियंत्रण कक्षात रुजू झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra