गुन्हेपुणे

खराडीमधील त्या तरुणाच्या खुनाची उकल, तरुणाच्या पत्नीच्याच पूर्वाश्रमीच्या प्रियकरानेच केला त्याचा गेम

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)

पुण्यातील चंदननगर परिसरात एका कचरावेचक तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.या तरुणाच्या पत्नीच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरानेच त्याचा खून केला असल्याचे तपासात समोर आले आहे.
टीव्हीवर क्राईम सिरीयल पाहून त्याने हा सर्व कट रचला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पुणे : फक्त प्रेमात अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून केल्याचा संतापजनक प्रकार चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खराडीत घडला आहे. खराडी येथे कचरा वेचण्यासाठी कामावर निघालेल्या तरुणावर पिस्तुलातून ३ गोळ्या झाडून त्याचा भर रस्त्यात सकाळी खून करण्यात आला होता.
या खुनाचा अखेर उलगडा पुणे शहर पोलिसांनी केला आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने त्याचा खून करण्यात आला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट – ४ च्या पथकाने याप्रकरणी दोन आरोपींना सोलापूर येथून अटक केली आहे. संतोष सत्यवान शिंदे (वय २८, बिदर, कर्नाटक, मूळ रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर) आणि संग्राम ऊर्फ बाबू राजू बामणे (रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अक्षय प्रकाश भिसे (वय २६, रा. दिनकर पठारे वस्ती, खराडी) असे गोळ्या झाडून खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय प्रकाश भिसे या खराडी येथे राहणाऱ्या तरुणाचा २१ ऑगस्ट रोजी सकाळी कचरा वेचण्यासाठी कामावर निघालेला असताना दोघांनी त्याच्यावर पिस्तुलातून ३ गोळ्या झाडल्या आणि त्याचा खून केला होता. याच प्रकरणाचा समांतर तपास चंदननगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाकडूनही सुरू होता. खुनाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी सांगितले, की आरोपींनी मोबाइलवर गुन्हेगारीशी संबंधित क्राइम वेब सिरीज, चित्रपट तसेच मालिका पाहिली होती. ती पाहूनच या आरोपींनी अक्षयच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेश येथून पिस्तूलही खरेदी केले. पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करून आरोपींना बेड्या ठोकल्या.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, राजस शेख, हरीश मोरे, प्रवीण भालचिम, सारस साळवी, अशोक शेलार यांच्या पथकाने केली. आरोपी आणि मृतांमध्ये इतर काही वाद होते का, पिस्तूल कोणाकडून घेतले, आरोपींचे आधीचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, या सर्व अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra