गुन्हे

पुणे ग्रामीण पोलीसांचा छापा; नांदेड सिटी परिसरातील ब्लु बेरी स्पा मध्ये एक्स्ट्रा सर्व्हीसच्या नावाखाली सुरु होता गोरख धंदा, विदेशी तरुणीसह ३ स्थानिक तरुणींची सुटका

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)

पुणे : सिंहगड रोड वरील नांदेड सिटी डेस्टीनेशन सेंटर मॉलमधील ब्लु बेरी स्पा मसाज सेंटरवर पुणे ग्रामीण पोलीसांच्या पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसाय करणा-या एक परदेशी व दोन स्थानिक तरुणींची सुटका केली आहे. मसाज सेंटर मालक व व्यवस्थापक असे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी दिली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करणेसाठी पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर घुले, सहा.पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला पोलीस हवालदार ज्योती बांभळे, पूनम कांबळे, सिमा जगताप यांचे पथक नेमून त्यांना अवैध वेश्याव्यवसाय धंद्याची माहिती काढून दंडात्मक कारवाई करणेबाबत आदेश दिलेले होते. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ सप्टेंबर २०२२ रोजी पथक सिंहगड रोड नांदेड सिटी मेन गेट येथे गोपनीय माहिती काढत असताना पोलीस उपनिरीक्षक सुधीर घुले यांना नांदेड सिटी येथील डेस्टीनेशन सेंटर मॉलचे पहिला मजल्यावरील शॉप नं. एफ-६४ या ठिकाणी ब्लु बेरी स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली परदेशी तरुणीकडून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे खात्री करणेसाठी पोलीस पथकाने मसाज सेंटरवरील छापा टाकण्याचे नियोजन करुन त्या ठिकाणी बनावट गि-हाईक पाठविला असता. तेथे मसाजच्या नावाखाली एक्स्ट्रा सर्व्हीसचे नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर पोलीसांनी त्या ठिकाणी सापळा रचून दुपारी तीन वाजताच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी सदर ठिकाणी मसाज सेंटर चालविणारा एक मालक, दोघे मॅनेजर तसेच एक परदेशी व दोन स्थानिक पिडीत तरुणी मिळून आल्या. मसाज सेंटरचे मालक मुंजा रामदास शिंदे (वय ३१ रा.वडगाव ता.हवेली जि.पुणे), व्यवस्थापक योगेश पवार (रा.नांदेड गाव ता.हवेली जि.पुणे ), अथर्व प्रशांत उभे (वय १९ रा.धायरी, बेनकरवस्ती ता.हवेली जि.पुणे) व महिला व्यवस्थापक ज्योती विपुल वाळींबे (वय ३० रा.न-हे, ता.हवेली जि.पुणे) हे पिडीत तरुणींना जादा पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करुन मसाज सेंटर स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे निष्पन्न झालेने त्या चौघांचे विरुध्द हवेली पोलीस स्टेशनला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मसाज सेंटर येथे मिळून आलेल्या पिडीत ३ तरुणींना महिला सुधार गृह येथे पाठविण्यात आलेले आहे. तेथेे छाप्याचे वेळी मिळून आलेले मसाज सेंटरचे मालक मुंजा रामदास शिंदे, व्यवस्थापक अथर्व प्रशांत उभे व ज्योती विपुल वाळींबे यांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून मुख्य आरोपी योगेश पवार याचा शोध चालू आहे. अटक आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेणेकामी त्यांना कोर्टात हजर करण्यात येत आहे. कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर घुले, सहायक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला हवालदार ज्योती बांभळे, पूनम कांबळे, सिमा जगताप यांचे पथकाने केलेली आहे.

पुणे ग्रामीण जिल्हयात अशा प्रकारचे वेश्या व्यवसाय व इतर अवैध धंद्यावर दंडात्मक कारवाई करणेबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी आदेश दिलेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra