शिक्षणमहाराष्ट्र

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) तांत्रिक सहायक, विमा संचालनालय,संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०६ ऑगस्ट, २०२२ व दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील तांत्रिक सहायक, विमा संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण १४ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे.

या परीक्षेमध्ये सांगली जिल्हयातील पाटील मंजूनाथ गोपाळ हे राज्यातून प्रथम आले आहेत. मागासवर्गवारीतून हिंगोली जिल्हयातील पायघन ओमेश किसन प्रथम आले आहेत. महिला वर्गवारीतून अमरावती जिल्हयातील श्रीमती पाचंगे अंकिता सुरेश ह्या प्रथम आल्या आहेत.उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra