राजकारणमहाराष्ट्रसामाजिक

एक अनार सौ बिमार ही विरोधी पक्षाची परिस्थिती; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

डोंबिवली : एक अनार सौ बिमार ही विरोधी पक्षाची परिस्थिती आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार कोण असतील या मतावरून केसीआर आणि नितेश कुमार यांची झालेली उठक बैठक आपण पाहिली आहे. जिथे दोन लोक एकमेकांच ऐकत नाही तिथे २४ घटक दल काय करणार आहेत तिथे घटनाच घडतील, घटक दल देखील काही करू शकणार नाही. जे दोन लोक एकत्र बसू शकत नाही,जे एकमेकांना पाहू शकत नाहीत. जे जाती धर्म संप्रदायाच्या नावावर मत मागतात ते भारताच नवनिर्माण करू शकत नाही. ते केवळ राजकीय पोळ्या भाजण्याचेच काम करतात असा टोला भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षाला लगावला. भाजपाच्या वतीने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा आयोजित करण्यात आला आहे. डोंबिवलीमध्ये रात्री त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला असता विरोधी पक्षावर टीका केली. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे भारत जोडो अभियान सुरू आहे. यावर त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला, जे भारत सोडण्यावर जास्त विश्वास ठेवतात ते भारत जोडण्यावरती का विश्वास ठेवतील.अनेक वर्षानंतर ते दिसले आहेत, त्यांची पार्टीच त्यांना शोधत असते. संसदेच्या वेळी देखील ते मिळत नाही. त्यांची यात्रा जी आहे, ती दोन दिवसातच पडली जे आपण सर्वांनी पाहिलेल आहे. भारत एक मजबूत राष्ट्र आहे. सशक्त भारत, स्वस्थ भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बनत आहे. मात्र काही लोक आजही भारत जोडण्याची गोष्ट करतात, ते कुठल्या जगात राहतात माहीत नाही. त्यांना इतिहासाची थोडी माहिती असली पाहिजे होती. भारत देश पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काय काय प्रगती करत आहे हे त्यांनी पाहिले पाहिजे. पण काही काँग्रेसचे नेते हे आपले डोळे बंद करून बसले आहेत असे ठाकूर म्हणाले.

तुकडे तुकडे गँगचे लोक त्यांच्या यात्रेत सामील आहेत

माझं राहुल गांधी आणि सोनिया गांधींना माझा एक प्रश्न आहे असे म्हणत ठाकूर म्हणाले, राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत. त्यांच्यात तुकडे तुकडे गॅंग शामिल आहे. जेएनयू युनिव्हर्सिटी बाहेर जे लोक कधी पोस्टर लावत फिरायचे की भारत तेरे तुकडे होंगे हजार, इन्शा अल्ला इन्शाल्लाची घोषणाबाजी करत होते तेच लोक आज राहुल गांधी सोबत त्यांच्या यात्रेचा एक भाग आहे.हे तेच लोक आहेत जेएनयु मध्ये भारत तोडण्याची योजना आखायचे आणि रात्री त्यांना भेटायला राहुल गांधी जात होते. मी त्यावेळेला ही संसदेत विचारणा केली होती की राहुल जी देशाचे तुकडे करणाऱ्या लोकांसोबत आहे का देश वाचवणाऱ्या बरोबर व वाढवणाऱ्या बरोबर आहेत. तो चेहरा समोर आला आहे ते तुकडे तुकडे गँगचे लोक त्यांच्या यात्रेत सामील आहेत.

अनुराग ठाकूर यांना कल्याण लोकसभा उमेदवारी आणि जागेवरील प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट असे उत्तर दिले नाही. ते म्हणाले २०१४ आणि २०१९ मध्ये युतीच्या रूपात युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली. भारतीय जनता पार्टी पूर्ण देशात जिथे जिथे युती आहे, तिथे तिथे युतीचं धर्म पाळत आहे. आपण विचार करा बिहार असो, महाराष्ट्र असो भारतीय जनता पार्टीची जागा जास्त होत्या, मात्र आम्ही आमच्या मित्र पक्षाला मोठी संधी दिली. आमच्यासाठी पद महत्त्वाचे नव्हते भारतीय जनता पार्टी ही देश घडवण्याच्यापाठी लागली आहे,देशाला पुढे नेण्याच्या पाठी लागली आहे. सत्ता आमच्यासाठी सेवेचे साधन आहे, सत्येत येऊन सुद्धा प्रधानमंत्री प्रधान सेवकच्या रूपात काम करतात यापेक्षा मोठे उदाहरण देशात कुठे बघायला मिळाले नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra