राष्ट्रीय

महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी संपदा मेहता यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खासगी सचिवपदी नियुक्ती

पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खासगी सचिवपदी मूळच्या पुण्याच्या असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) संपदा सुरेश मेहता यांची निवड झाली आहे. त्या दोन दिवसांत पदभार स्वीकारतील. या निमित्ताने राष्ट्रपती भवनात आता मराठी चेहरा पोचला आहे. मेहता २००८ मध्ये ‘आयएसएस’ झाल्या असून महाराष्ट्र केडरच्या आहेत. राज्यात या पूर्वी त्यांनी मुंबई जिल्हाधिकारी या पदावर, जीएसटी विभागाच्या मुंबईच्या सहसंचालक तसेच जळगाव, हिंगोली, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांत काम केले आहे. मार्च २०२२ पासून त्या दिल्लीत प्रतिनियुक्तीवर असून सध्या केंद्रीय वित्त विभागात महसूल विभागाच्या त्या संचालक आहेत. मेहता यांचे पुण्यातील हुजूरपागा येथे शालेय तर, स. प. महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. दहावी आणि बारावी परीक्षेत त्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये त्या सनदी लेखापाल (चार्टड अकाऊंटंट) झाल्या. नंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांचे पती रणजित कुमार हेही महाराष्ट्र केडरचे आयएएस आहेत. या दांपत्याला एक मुलगा, एक मुलगी आहे. नव्या नियुक्तीबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना मेहता म्हणाल्या, ”राष्ट्रपतींबरोबर काम करण्याची संधी मिळणे, हा बहुमान आहे. या पदावर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करण्याचा माझा प्रयत्न असेल. केंद्र सरकारने माझ्यावर टाकलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra