पुणे

पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा जुगार अड्ड्यावर छापा, सुरू होता ५२ पत्त्यांचा रमी जुगार, १२ इसमांवर दंडात्मक कारवाई

(✍️मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून तब्बल १२ इसमावर दंडात्मक कारवाई केली आहे.

सोमवार दि. १२ रोजी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सोनिया गांधी नगर झोपडपट्टी, कैलास भवन नाल्याच्या कडेला एका पत्राच्या शेडमध्ये सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे पत्त्याचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनीयरित्या पाळत ठेवून छापा टाकला असता तिथे १० इसम ५२ पत्त्याचा रमी जुगार पैशावर खेळत असल्याचे दिसून आले, सदर ठिकाणावरून १० इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम १५, ४९०/- रुपये घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहे.

सदर जुगार अड्डा हा कोण चालवत आहे याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली असता सदर जुगार अड्डा हा २ इसम चालवत असल्याची माहिती मिळाली म्हणून सदर प्रकरणी नमूद १० ताब्यातील व २ पाहिजे आरोपी असे एकूण १२ इसमांविरुद्ध स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुरनं १९४/२०२२ महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करून आरोपींना पुढील कारवाईसाठी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्रीनिवास घाडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके , पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, पुष्पेन्द्र चव्हाण, यांनी केली

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra