महाराष्ट्र

देवी सरस्वती बाबत वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी भुजबळांनी माफी मागावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आक्रमक

(✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे)

मुंबई : फक्त ३ टक्के लोकांना शिकवणाऱ्या देवीचा फोटो कशाला? असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी शाळांमध्ये सरस्वतीचा फोटो कशासाठी असं विधान केले.

त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. भुजबळांनी माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. तर, मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांळामधुन स्वरस्वती देवीचा फोटो हटवला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. नुकताच सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पार पडला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना भुजबळ यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केले. शाळेत सरस्वती देवीची पूजा का करायची? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही असंही भुजबळ म्हणाले होते. देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का? पाहिले असेल तरी फक्त ३% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं देखील भुजबळ म्हणाले होता. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? असं म्हणत अप्रत्यक्षपणे सरस्वतीचा फोटो हटवण्याची मागणी केली होती. शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावावा असं त्यांनी यावेळी सांगीतले. भुजबळांच्या या वक्तव्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. संत महंतांकडून देखील या वक्तव्याचा निषेध केला जातोय. ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भुजबळ यांच्या विधानावर आक्षेप घेतला होताय. भाजपनं भुजबळांकडून माफीची आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेला याबद्दल भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.तर मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांळामधुन स्वरस्वती देवीचा फोटो हटवला जाणार नाही असे जाहीर केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra