सामाजिकपर्यटनमहाराष्ट्र

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! सप्तशृंगी गडावरील बोकड बळी बंदी उठवली, येत्या दसऱ्याच्या मुहूर्ता पासून मागील पाच वर्षांपासून बंद करण्यात आलेली बोकड बळीची प्रथा पुन्हा भाविकांना अनुभवता येणार

(✍️मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे)

नाशिक : नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बोकड बळीची प्रथा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या दसऱ्याच्या मुहूर्ता पासून मागील पाच वर्षांपासून बंद करण्यात आलेली बोकड बळीची प्रथा पुन्हा भाविकांना अनुभवता येणार आहे. ही प्रथा पुन्हा सुरू व्हावी यासाठी आदिवासी विकास संस्थेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयाने सुनावणी देत प्रथेला पुन्हा परवानगी दिली आहे. सध्या नवरात्र पर्व सुरु असून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सप्तशृंगी गड पुन्हा चर्चेत आला आहे. येथील सप्तशृंगी गडावर दसऱ्याच्या दिवशी पूर्वीपासून सुरु असलेली बोकड बळी देण्याची प्रथा पुन्हा एकदा सुरु होणार आहे. ही प्रथा मागील पाच वर्षांपासून प्रशासनाने बंद केलेली होती. प्रथा पुन्हा सुरू करण्यासाठी दाखल जनहित याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होवून न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल देत अटी-शर्तीनूसार बोकड बळी देण्याची प्रथा परंपरा पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सप्तशृंगी देवीचे मंदिर सर्वपरिचित आहे. या गडावर दरवर्षी बोकड बळी दिला जात असे. मात्र पाच वर्षांपूर्वी बोकड बळीच्या परंपरेवर तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांनी बंदी घालण्यात आली होती. याच बंदी विरोधात सुरगाणा तालुक्यातील धोडांबे येथील आदिवासी विकास संस्थेने जुलै २०१९ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. आज याचिकेवर सुनावणी होऊन आदिवासी विकास संस्थेच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे. न्यायालयाने बंदी उठवल्याने यंदाच्या वर्षी सप्तशृंग गडावर यंदा बोकड बळीचा विधी होणार आहे. एकूणच या निर्णयाने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून यंदाच्या वर्षी पाच वर्षाच्या खंडानंतर होणारा बोकड बळीचा विधी उत्साहात साजरा होणार आहे.

…. म्हणून प्रथेवर घातली होती बंदी

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बोकड बळी देण्याची परंपरा आहे. मात्र ११ सप्टेंबर २०१६ ला दसऱ्याच्या दिवशी बोकड बळी देण्याचा विधी सुरू असतांना सुरक्षा रक्षकाकडून अनावधानाने रायफलमधून गोळी सुटली होती. त्यानंतर ती गोळी भितींवर जाऊन आदळल्याने त्यातील गोळीचे छर्रे हे गर्दीत उडाल्याने भाविकांना लागून १२ भाविक किरकोळ जखमी झाले होते. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच गाजले होते. यानंतर पोलीस प्रशासनाने याबाबतचा अहवाल प्रशासनाला दिला होता. त्यानंतर बोकड बळीचा विधीवर तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी बंदी घालण्यात आली होती.

उच्च नायायालयाचा निर्णय

दरम्यान घटनेनंतर काही वर्षांनी सुरगाणा तालुक्यातील आदिवासी संस्थेने याबाबत २०१९ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात आज गुरुवारी सुनावणी पार पडली आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला असून अटी शर्तीनूसार बोकड बळी देण्याची प्रथा परंपरा पूर्ववत सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सप्तशृंगी गडावर दसऱ्याच्या दिवशी श्री भगवतीच्या मंदीर पायऱ्यांवरील दसरा टप्प्यावर प्रथेनुसार बोकड बळी देण्याची परंपरा आहे. यासाठी न्यायालयीन लढाईसाठी नांदुरी गावातील ग्रामस्थ, सप्तशृंगी गडावरील भाविकांनी पाठपुरावा केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra