महाराष्ट्र

राज्यात २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)

मुंबई : दिवाळीपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील २४ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडका फडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये उप आयुक्त तसेच पोलिस अधिक्षक पदाच्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आज सायंकाळी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

पोलीस अधीकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या कंसात कोठून कोठे

१). धनंजय आर कुलकर्णी (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक रत्नागिरी)

२). बसवराज तेली (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर ते पोलीस अधीक्षक, सांगली)

३). शेख समीर अस्लम (अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली ते पोलीस अधीक्षक, सातारा)

४). अंकित गोयल (पोलीस अधीक्षक, गडचिरोली ते पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)

५). राकेश ओला (पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर ते पोलीस अधीक्षक अहमदनगर)

६). एम. राजकुमार (पोलीस अधीक्षक लोहमार्ग, नागपूर ते पोलीस अधीक्षक, जळगाव)

७.) रागासुधा आर. (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.३, जालना ते पोलीस अधीक्षक परभणी)

८). संदीप सिंह गिल (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र. १२ हिंगोली ते पोलीस अधीक्षक हिंगोली)

९). श्रीकृष्ण कोकाटे (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक नांदेड)

१०). गौरव सिंह (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक ते पोलीस अधीक्षक यवतमाळ)

११). संदीप घुगे (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.११ नवी मुंबई ते पोलीस अधीक्षक अकोला)

१२). रविंद्रसिंग एस परदेशी (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ते पोलीस अधीक्षक चंद्रपूर)

१३). नरुल हसन (पोलीस उपायुक्त नागपूर शहर ते पोलीस अधीक्षक वर्धा)

१४). निखिल पिंगळे (पोलीस अधीक्षक लातूर ते पोलीस अधीक्षक, गोंदिया)

१५). निलोप्तल (पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई ते पोलीस अधीक्षक गडचिरोली)

१६). संजय ए बारकुंड (पोलीस उपायुक्त, नाशिक शहर ते पोलीस अधीक्षक, धुळे)

१७). श्रीकांत परोपकारी (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पोलास उपायुक्त, ठाणे शहर)

१८). सचिन अशोक पाटील (पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) ते पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद)

१९). लक्ष्मीकांत पाटील (पोलीस उपायुक्त ठाणे शहर ते प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर)

२०). पराग शाम मणेरे (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते उपायुक्त, विशेष सुरक्षा विभाग (VIP Security) .मुंबई

२१). पवन बनसोड – (अपर पोलिस अधीक्षक, औरंगाबाद (ग्रा.) ते पोलिस अक्षीक्षक, सिंधुदुर्ग)

२२). शिरीष एल. सरदेशपांडे – (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र

पोलिस अकादमी, नाशिक ते पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रा.)

२३). सोमय विनायक मुंडे – (अपर पोलिस अधीक्षक, गडचिरोली ते पोलिस अधीक्षक, लातूर)

२४). सारंग डी. आवाड – (पोलिस उप आयुक्त, नागपूर शहर ते पोलिस अधीक्षक, बुलढाणा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra