राष्ट्रीय

२०२४ पर्यंत प्रत्येक राज्यात NIA कार्यालय असेल; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महत्वपूर्ण घोषणा

(✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे)

नवी दिल्ली : एनआयए (National Investigation Agency-NIA) या केंद्रीय तपास संस्थेला अतिरिक्त अधिकार देण्यात आले असून २०२४ सालापर्यंत प्रत्येक राज्यामध्ये त्याचं कार्यालय असेल अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

हरयाणा राज्यातील सुरजकुंड या ठिकाणी राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेचे उद्धाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, “देशभरातील सायबर गुन्हे, नार्कोटिक्स, सीमेपलिकडून होणारे दहशतवादी हल्ले, राष्ट्रविरोधी कारवाया आणि अशाच प्रकारच्या इतर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण देशभरात संयुक्त योजना राबवण्यात येणार आहे. को-ऑपरेशन, को-ऑर्डिनेशन आणि कोलॅबोरेशन या तीन सी च्या आधारे हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्याच माध्यमातून सहकारी संघराज्यवादाची मूल्येही जपण्यात येतील.”

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra