गुन्हे

कारण छोट, हत्याकांड मोठ! पोटच्या मुलाने केली बापाची ऐन भाऊबीजेच्या दिवशीच कुऱ्हाडीने हत्त्या! गोंदिया जिल्ह्यातील घटना

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)

गोंदिया : पोटच्या मुलाने आपल्या वडिलांचीच हत्या केली असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

भाऊबीजेच्या दिवशीच हे धक्कादायक हत्याकांड घडलं. चक्क कुऱ्हाडीने वार करत मुलाने वडिलांचा जीव घेतलाय. याप्रकरणातील आरोपी मुलाला पोलिसांनी अटक देखील केलीय. गोंदिया पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मोतिराम टांगसू कुंभरे, वय ६० असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील मोकासीटोला इथं घडलेल्या या घडनेनं एकच खळबळ माजलीय.

वाद छोटा, राग मोठा

गोंदिया जिल्ह्यातील मोकासीटोला इथं गोवर्धन पुजेच्या कार्यक्रमावेळी बाप आणि मुलामध्ये भांडण झालं. मोतिराम टांगसू कुंभरे आणि आरोपी मुलगा यांच्या घरगुती कारणावरुन खटके उडाले. क्षुल्लक भांडणाच्या राग मुलाला सहन झाला नाही. त्याने थेट कुऱ्हाड हातात घेतली आणि वडिलांवर त्याने समासप वार केले.

दिवाळीचं गायगोधन आणि भाऊबीजच्या दिवशी घडलेल्या घडलेलं संपूर्ण गावात खळबळ उडाली. ऐन दिवेलागणीच्या वेळेला घडलेल्या या हत्याकांडामुळे सगळ्यांच मोठा धक्का बसला होता. अखेर पोलिसांना या हत्याकांड प्रकरणाची माहिती देण्यात आली.

गोंदिया जिल्ह्यतील डुग्गीपार पोलीस ठाण्यात या हत्याप्रकरणाची नोंद करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा नोंद केलाय. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय.

मोतिराम यांचं मुलासोबत नेमकं भांडण कोणत्या कारणावरुन झालं? मुलाचा याआधीही वडिलांवर राग होता का? मुलाने टोकाचं पाऊल उचलण्यात नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra