राजकारण

SRA घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार, पण ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी नाही; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

 

✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

केवळ एक प्रकरण नाही, तर एसआरएच्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा दादर पोलिसांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यासंदर्भात आज सोमय्यांनी कागदपत्रं जमा केली. पेडणेकर यांनी कोविड काळात घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. सोमय्या यांनी या विषयावर प्रसारमाध्यमांशी पत्रकार परिषदेत संवाद साधला.

‘SRA घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार’

एसआरए घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार केली होती, पण उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी झाली नाही, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.सोमय्यांनी या प्रकरणात आरोप केला आहे की, ठाकरे सरकारला पुरावे दिले होते, मात्र ठाकरे यांच्या सीएमओकडून दबाव आल्यानं घोटाळ्याची चौकशी झाली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं झाल्याचंही सोमय्यांनी सांगितलं आहे. किशोरी पेडणकर यांच्यावर सोमय्यांनी तक्रार दाखल केली असून पेडणेकरांवर सहा ठिकाणी तक्रार दाखल असल्याची माहिती सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

‘दिवंगत भावाच्या नावावर पेडणेकरांनी फसवणूक केली’

दरम्यान, भारत सरकारच्या कंपनी मंत्रालयानं तक्रारीची दाखल घेतल्याचं सोमय्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे, एसआरएनं चौकशी सुरु केली आहे, असं सोमय्यांनी म्हटलं, शिवाय एसआरएच्या सीईओंशी बोलल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा करून पैस कमवून घोटाळा करून बेनामी संपत्ती कमवल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. तसेच दिवंगत भावाच्या नावावर किशोरी पेडणेकर यांनी फसवणूक केल्याचा आरोपही सोमय्यांनी केलाय.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आणखी एका एसआरए घोटाळ्याप्रकरणी कागदपत्रं माध्यमांसमोर आणली. गोमातानगर एसआरए प्रकल्पात पेडणेकर यांचे गाळे असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर पेडणेकर यांनी काल पत्रकारांसह गोमाता नगरमध्ये जाऊन आपला गाळा असेल तर टाळे ठोकेन असं आव्हान दिलं होतं. त्यानंतर दादरमधील एका एसआरए प्रकल्पाबाबत पोलीस पेडणेकर यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी पोलीस पेडणेकर यांना आज चौकशीसाठी पुन्हा समन्स धाडलं आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी पेडणेकरांविरोधात एसआरए घोटाळ्याची कागदपत्रं माध्यमांसमोर सादर केलीत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra