गुन्हेपुणेमहाराष्ट्र

नायजेरियन पती-पत्नीकडून कोट्यावधी रुपयाचे अंमली पदार्थ जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथक -१ गुन्हे शाखा पुणे शहर, पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : नायजेरियन पती-पत्नीकडून कोटयावधी रुपयांचे कोकेन, एम. डी. असे जप्त करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

२६/०७/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे शाखेकडे नेमणुकीस असलेले पोलिस अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नालंदा गार्डन रेसीडन्सी, बाणेर पुणे या ठिकाणी एक नायजेरियन पती-पत्नी राहत असून ते रहाते घरातून कोकेन एम डी असे अंमली पदार्थाची मोठया प्रमाणावर विक्री करीत आहेत. सदरची खबर पोलिस अंमलदार यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा.पो.निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर यांना कळविली असता, त्याबाबत मिळालेल्या बातमीचे ठिकाणी छापा टाकला. नायजेरियन १) उगुचुकु इम्यॅन्युअल ( वय ४३ वर्षे, रा, नालंदा गार्डन रेसीडन्सी सी विंग फ्लॅट नंब १३ बाणेर पुणे. मुळ नायजेरीया देश व महिला २) ऐनीबेली ओमामा व्हिवान ( वय ३० वर्षे, रा. नालंदा गार्डन रेसीडन्सी सी विंग फ्लॅट नं. १३ बाणेर पुणे. मुळ नायजेरीया देश) हे बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ६४४ ग्रॅम (एम. डी) मॅफेड्रॉन किंमत रुपये ९६,६०,००० व २०१ ग्रॅम १२० मिलीग्रॅम कोकेन किरु ३०,१६,८०० व रोख रुपये ०२,१६,००० मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा प्लास्टिक पिशव्या व डब्या असा ०२,१६,००० रुपयांचा असा एकूण १,३१,०८,८०० (एक कोटी एकतीस लाख आठ हजार आठशे) रुपयांचा अंमली पदार्थ व ऐवज ते रहात असलेल्या घरात अनाधिकाराने बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळून आले. त्यांच्या विरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २२ (क), २९ अन्वये म. सहा. पो. निरीक्षक, शैलजा जानकर यांनी फिर्याद दिल्याने आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लक्ष्मण ढेंगळे,सहा.पोलिस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर हे करीत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त, गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा.पो आयुक्त,गुन्हे १, गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विनायक गायकवाड, सपोनि लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलिस अंमलदार, मारुती पारधी, मनोज साळुंके, राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, रेहना शेख, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra