
✍️ मुख्य संपादक – श्री. नरसिंग कांबळे
पुणे : मुंढवा पोलिसांनी पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून गुप्त बातमीच्या आधारे सापळा रचुन सिताफिने एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस हस्तगत करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. त्यामुळे मुंढवा पोलिसांच्या या कामगिरीमुळे मोठा अनर्थ होण्यापासून वाचला आहे.
मंगळवार दि.१/११/२०२२ रोजी मुंढवा चौक कडून मगरपट्टा जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या ब्रिज खाली अविनाश सुनील जगताप नावाचा इसम स्वतः जवळ गावठी पिस्टल बाळगुन फिरत असल्याची गोपनीय माहिती मुंढवा पोलिसांच्या तपास पथकास मिळाली.
सदर बातमीची खातरजमा करणे कामी मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजित लकडे यांनी तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे व प्रशांत माने यांना तपास पथकातील इतर अंमलदारांसह सदर ठिकाणी रवाना केले असता,
सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे व प्रशांत माने यांनी आपल्या अंमलदारांसह साध्या वेषात सदर ठिकाणी सापळा लावला. सदर ठिकाणी एक इसम हा संशयित रित्या हालचाल करताना दिसला त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, प्रशांत माने व तपास पथकातील अंमलदार यांनी सदर इसमास दोन पंचासह ताब्यात घेऊन सदर संशयित इसमास नाव पत्ता विचारले असता, अविनाश सुनील जगताप वय २९ वर्ष, रा. चव्हाण चाळ, गोपी मेडिकल, २२६, मंगळवार पेठ पुणे, असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष अविनाश जगताप यांची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे पॅंटचे आत मागील बाजूस कमरेत खोचलेले लोखंडाचे गावठी पिस्टल मॅगझिनसह त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे किंमत रूपये १७,०००/- चे मिळुन आले. पिस्टल व दोन जिवंत काडतुसे विनापरवाना जवळ बाळगले त्याबाबत मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर २८८/२०२२ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह. १३५, प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यांमध्ये नमूद आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
सदर आरोपीविरुद्ध फरासखाना पोलीस ठाणे येथे शरीराविरुद्धचे दोन गुन्हे दाखल असून तो पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे.
वरील कामगिरी ही पुणे शहर पोलीस आयुक्त मा. श्री अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त मा. श्री. संदिप कर्णिक, पूर्व विभागाचे अपर पोलीस आयुक्त, मा. श्री नामदेव चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ५ मा. श्रीमती नम्रता पाटील, सहा पोलीस आयुक्त हडपसर विभाग, मा. श्री बजरंग देसाई, यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गून्हे) प्रदीप काकडे, सहा. पोलीस निरीक्षक, संदीप जोरे, सहा. निरीक्षक, प्रशांत माने, पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे, वैभव मोरे, राजू कदम, महेश पाठक, राहुल मोरे, सचिन पाटील यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.




