सामाजिकमहाराष्ट्रराष्ट्रीय

महापरिनिर्वाण दिनासाठी पालिका सज्ज; तात्पुरता निवारा, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पाणी, शौचालये, स्नानगृहे आदी सेवासुविधा उपलब्ध

मुंबई – भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी येणाऱ्यां आंबेडकरी अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह यासह विविध ठिकाणी नागरी सेवासुविधा उपलब्ध केल्या आहेत.

यामध्ये तात्पुरता निवारा, शामियाना, व्हीआयपी कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, महिला व पुरूष शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह मोबाईल चार्जिंग सुविधा आदी सुविधांचा समावेश आहे. शिवाय चैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रमाचे मोठय़ा पडद्यावर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती उपआयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली.

  • महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्यांची सुविधा म्हणून परिसरातील महानगरपालिकेच्या सहा शाळांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे. या शाळांमध्येदेखील आवश्यक त्या सर्व नागरी सेवासुविधा तैनात ठेवण्यात येणार आहेत. पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रतिवर्षीप्रमाणे महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या एक लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येते. या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आज ५ डिसेंबर रोजी सकाळी झाले.

महानगरपालिकेकडून चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra