सायकलवर फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाचा मोबाईल चोरणारा गुन्हे शाखेच्या युनिट १ कडून गजाआड

पुणे : सायकलिंग करणाऱ्या तरूणाला रस्त्यात अडवून त्याचा महागडा मोबाइल चोरणाऱ्याला युनीट एकने अटक केली. त्याच्याकडून 65 हजारांचा मोबाइल जप्त करण्यात आला. ही घटना 19 जूनला पहाटे पाचच्या सुमारास हडपसर परिसरात घडली होती.
रुपेश मनोज क्षीरसागर (वय 24 रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
फिर्यादी तरूण 19 जुनला पहाटे पाचच्या सुमारास शिवाजीनगरहून सायकलिंग करीत हडपसर परिसरात गेले होते. त्यावेळी दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी त्यांना अडवून 65 हजारांचा महागडा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी मोबाइल विक्रीच्या तयारीत एकजण हायस्कूलजवळ थांबल्याची माहिती पोलीस अमलदार नीलेश साबळे आणि अजय थोरात यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेत महागडा मोबाइल जप्त केला.
ही कामगिरी अपर आयुक्त रामनाथ पोकळे उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अजय जाधव, अजय थोरात, निलेश साबळे, राहुल मखरे, अमोल पवार, इम्रान शेख, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, शुभंम देसाई, महेश बामगुडे, अय्याज दडडीकर, तुषार माळवदकर, रुक्साना नदाफ यांनी केली.



