गुन्हेपुणे

हडपसर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, दुचाकी चोराकडून ११गुन्हे उघड…

पुणे : वाहनचोरीचे १० गुन्हे व फ्लिपकार्ट बॅग चोरीचा १ असे ११ गुन्हे उघड करून ५,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
हडपसर पोलिस स्टेशन हद्दीत वाहनचोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने त्याबाबत कारवाई करणेबाबत वरिष्ठ पोलिस हडपसर पोलिस ठाणे पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांना मिटींग घेवून त्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यामध्ये हडपसर हद्दीत वाहनचोरीचा हॉटस्पॉट असलेला भाग अॅमनोरा मॉलच्या पाठीमागे असलेल्या भागातून वेळोवेळी दुचाकी गाड्या चोरीस जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार तपास पथक अधिकारी विजयकुमार शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, अविनाश शिंदे पोलिस उप निरीक्षक, पोलिस अंमलदार अवनिाश गोसावी, प्रशांत दुधाळ सुरज कुंभार, भगवान हंबर्डे असे पोलिस ठाणे हद्दीत वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत होते. यावेळी एक जण संशयीत रित्या दुचाकी सह मिळून आला. त्याच्याकडे गाडीचे कागदपत्राबाबत विचारता त्याने असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यास पोलिस ठाणेस घेवून येवून त्याचेकडे तपास केला. आरोपी आकाश मनोहर गायकवाड (वय २६, रा. नेहरू पार्क गणपती मंदीरशेजारी, काळेपडळ हडपसर पुणे) याने हडपसर, कोंढवा, भारती विद्यापीठ, सासवड या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी आकाश मनोहर गायकवाड यास हडपसर पोलिस ठाणे गु.र.नं ८८० / २०२२ भा.दं.वि. कलम ३७९,३४ या गुन्ह्यात अटक करून १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

तसेच फ्लिपकार्ट डिलेव्हरी बॉय हा १६/०७/२०२२ रोजी दुपारी १.०० च्या सुमारास पार्सल देण्याकरीता अॅड्रीनो टॉवर अॅमनोरा पार्क मगरपटटा सर पुणे येथे त्याच्या दुचाकीवर येवून, दुचाकी पार्क करून, पार्सल देण्याकरीता बिल्डींग मध्ये जावून परत आला असता दुचाकीवर लावलेली डिलेव्हीरी बॅग ही मिळून न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये १९,००० रुपयांचे डिलेव्हरी साहित्य बॅगसह चोरीस गेले होते. सदरची डिलेव्हरी बॅग व चोरीस गेलेले साहित्य हे आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे. आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकूण ११ गुन्हे उघडकीस झाले असून ५,२०,००० रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यामध्ये ९ अॅक्टीव्हा, १ पॅशन प्रो अशा अशा १० दुचाकी आणि फ्लिपकार्ट बॅग मधील बारकोड असलेला माल असा जप्त करण्यात आल्या आहेत. उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे.
१) हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर- ८३२ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
२) हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर- ८३४ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
३) हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर- ८४४ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
४) हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर- ८६७ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
५) हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८७८/२०२२ भा.द.वि. कलम ३७९
६) हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर- ८८० / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
७) हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर- ८८१/२०२२ भा.द.वि. कलम ३७९
८) हडपसर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८७१/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ ( फ्लिपकार्ट बॅग चोरी )
९) भारतीविद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर- ४७६ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
१०) कोंढवा पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ७४४/२०२२ भा.द.वि. कलम ३७९
११) सासवड पोलिस स्टेशन, पुणे ग्रामिण गुन्हा रजि. नंबर- २८१ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९
सदरची कामगिरी ही नामदेव चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व नम्रता पाटील, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे मागदर्शनाखाली बजरंग देसाई, सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन, पुणे शहर, पोनि. (गुन्हे) विश्वास डगळे सो, पोनि. (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलिस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे यांच्या पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra