महाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त, शरद पवार यांचा मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनुसार पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल बरखास्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील सेल आणि विभागाबाबत हा निर्णय घेण्यात आला नाही. निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली असून त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे सेल बरखास्त करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे की, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने, सर्व राष्ट्रीय स्तरावरील विभाग आणि सेल (महिला काँग्रेस वगळू) राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकारणी तात्काळ बरखास्त करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे हा निर्णय का घेतला हे समजू शकले नाही. पक्षाच्या या पदांवर लवकरच नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. या बरखास्तीचे पत्र पक्षाच्या सगळ्या सेलच्या प्रमुखांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पाठवण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra