क्रीडाराष्ट्रीय

रौप्य पदकविजेता ‘संकेत’ ला राज्य सरकारकडू ३० लाखांचे पारितोषिक जाहीर

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई – इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022 ) सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांने वेटलिफ्टिंगमध्ये पुरूषांच्या 55 किलो गटात शनिवारी रौप्यपदक पटकावले आहे.

संकेत सरगरने स्नॅच आणि क्‍लीन अँड जर्कमध्ये एकूण 248 किलो वजन उचलून रुपेरी कामगिरी केली.

बर्मिंगहममधील या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक आहे. या कामगिरीच दखल घेत राज्य सरकारने संकेत सरगरला तीस लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे. तसेच त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

संकेत हा हिंदकेसरी कै. मारूती माने यांच्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणारा सांगलीतील दुसरा खेळाडू आहे. 1970 साली कै. मारूती माने यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. आज तब्बल 52 वर्षाने सांगलीच्या खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपर्यंत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra