
(श्री. नरसिंग कांबळे – ✍️ मुख्य संपादक)
पुणे : पुणे शहराचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे व पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांनी युनिट एकचे कार्यक्षेत्रात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करून शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार व हद्दपार केलेले गुन्हेगार यांना चेक करून तसेच अवैध अग्नीशास्त्र विरोधी विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे अट्टल गुन्हेगार यांच्यावर योग्य ती कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
त्याप्रमाणे दिनांक ३१/०७/२०२२ रोजी गुन्हे शाखा युनिट – १ पथकातील पोलीस अंमलदार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खुनाचा प्रयत्न मधील पाहिजे आरोपी विशाल फाळके याच्याकडे पिस्टल सारखे हत्यार आहे. व तो पिस्टल सारखे हत्यार जवळ बाळगून मंगला टॉकीजवळ पुणे मनपा येथे येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले गुन्हे शाखा युनिट – १ यांना सांगितली. त्यांनी ती वरिष्ठांना माहिती देऊन पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड व स्टाफ यांना आदेशित केले त्याप्रमाणे युनिट – १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक ३१/०७/२०२२ रोजी पुणे मनपा जवळ मंगला टॉकीज येथे सापळा रचून सायंकाळी ६ वाजता आरोपीस शीताफिने पकडून त्याला त्याचे नाव विचारता त्याने आपले नाव विशाल सज्जन फाळके वय – ३० वर्षे , रा मु पो वायफळे ता. तासगाव जि. सांगली सध्या राहणार येरवडा पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची स्टाफच्या मदतीने पंचासमक्ष अंग जडती घेतली. असता त्याच्याकडे झडती मध्ये त्याच्या पॅन्ट मध्ये कमरेस डाव्या बाजूस खोचलेले किं. रु, ६०,००० (साठ हजार रुपये) किमतीचा एक लोखंडी धातूचे रिवाल्वर मिळून आले. व त्यांच्या पॅंटच्या खिशामध्ये ८ जिवंत राऊंड असा किं. रु, ६०,८०० (साठ हजार, आठशे रुपये) किमतीचा माल मिळून आला. याबाबत पोलिस अंमलदार इमरान शेख यांनी तक्रार दिल्याने नमूद इसमाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक ११५/२०२२ भारताचा हत्यार कायदा कलम ३(२५), म. पो. का ३७(१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर आरोपी विरोधात पुणे शहरात व ग्रामीण पोलीस ठाणे मध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, शस्त्र जवळ बाळगणे अशा प्रकारे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. मोका मधून नुकताच जामीनावर सुटून सध्या तासगाव पोलीस ठाणे सांगली येथे खुनाचा प्रयत्नाचा गुन्ह्यामध्ये हा फरार आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास करता त्याने गावाकडे झालेल्या भांडणे करीता रिवाल्वर स्वसंरक्षणार्थ वापरत असल्याचे गुन्हे शाखा युनिट- १ कडील पोलिसांना सांगितले.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – १ गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट – १ गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी अजय जाधव, पोलीस कर्मचारी इमरान शेख, अजय थोरात अमोल पवार, निलेश साबळे, अय्याज दड्डीकर, अभिनव लडकत, महेश बामगुडे यांनी केली आहे



