गुन्हेपुणेसामाजिक

वानवडीत मसाज सेंटर मध्ये एक्स्ट्रा सर्विस च्या नावाखाली चालत होता गोरख धंदा, पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे डॅशिंग पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी छापा टाकून, ५ आरोपीवर केली धडक कारवाई, तर ४ पीडित मुलींची केली सुटका

पुरानिक साहेब आपण जुगाराचे अड्डे केलात बंद! आता करा मसाज सेंटर मधील एक्स्ट्रा सर्व्हिस बंद.

(श्री. नरसिंग कांबळे – ✍️ मुख्य संपादक)

पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.
पण याच शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात काही महिन्यांपूर्वी अवैध धंद्यांना ऊत आला होता.
पुणे शहराच्या मध्यभागी ठिकठिकाणी मटका जुगाराचे अड्डे, पत्त्याचे क्लब, अवैध गावठी दारू विक्री, अवैध गुटखा विक्री, बेकायदेशीर हुक्का पार्लर, व मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणे अशा अनेक अवैध धंद्यांना ऊत आला होता. काही महिन्यांपासून पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या टीमने, अवैध धंद्यावाल्यांच्या मुसक्या आवळायला चालू केल्या, तेव्हापासून आज पर्यंत अनेक
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, स्थानिक पोलिसांचा आशीर्वाद असणाऱ्या, अवैध जुगार अड्ड्याची माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत त्यांना सळो की पळो केले आहे. त्यामुळे पुणे शहरातील अवैध मटका जुगाराचे अड्डे, पत्त्याचे क्लब, बेकायदेशीर हुक्का पार्लर, अवैध गावठी दारू विक्री, अवैध गुटखा विक्री, असे मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे पुणे शहरातून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या टीममुळे नाहीसे झालेले चित्र पाहायला मिळत आहे. ही पुणे शहराच्या सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बाब आहे.
पण जुगाराचे अड्डे नाहीसे झाले. मात्र मसाज सेंटरच्या नावाखाली चालणारे गोरख धंदे काही थांबले नाहीत.
त्यामुळे आता या कारवाईवरून पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या टीमकडून, मसाज पार्लरच्या नावाखाली गोरख धंदे करणाऱ्या विरुद्ध आता मोहीम हाती घेतली की काय असे पुण्यातील नागरिकांना वाटू लागले आहे.

पुरानिक साहेब आपण जुगाराचे अड्डे केलात बंद! आता करा मासाज सेंटर मधील एक्स्ट्रा सर्व्हिस बंद.

पुणे : पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उच्चभ्रू परिसरातील साळुंखे विहार येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उध्वस्त केले आहे. या ठिकाणाहून ४ पिढीत मुलींची सुटका करण्यात आली आहे.

बुधवार, दि.०३/०८/२०२२ रोजी साळुंके विहार या उच्चभ्रू परिसरातील ‘गोल्डन टच स्पा’, डी १०१/१०२, गिरमे हाइट्स, साळुंखे विहार रोड, वानवडी येथे मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाल्याने, सदर ठिकाणी पंचासमक्ष जाऊन, डमी कस्टमरसह, सापळा रुचून छापा टाकण्यात आला असता, तेथील पीडित मुलींकडून मसाज सह एक्स्ट्रा सर्विसच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा रक्कम घेऊन वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे खात्रीपूर्वक निदर्शनास आले. त्यावरून सदर ठिकाणी पंचनामा करून, ‘गोल्डन टच’ स्पाचे काउंटर वरील २ मॅनेजर आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यात मॅनेजर पैकी एक महिला आरोपी असून, सदर महिला ही परराज्यातील आहे,

१) मॅनेजर – झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल (वय २७ वर्ष, रा. कोंढवा पुणे, मूळ राहणार – पश्चिम बंगाल)
२) मॅनेजर – सुमित अनिल होनखंडे, वय २१ वर्ष, रा शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, स्पा मालक रचना संतोष साळुंखे,  लोचन अनंता गिरमे, सार्थक लोचन गिरमे, या मुख्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदर ठिकाणी कारवाई मध्ये एकूण ४ पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. त्यात एक छत्तीसगड राज्यातील व एक पश्चिम बंगाल राज्यातील आहे.
सदर प्रकरणातील नमूद आरोपी विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र..३०८/२२, कलम ३७०,३४, भा.दं.वि सह पिटा कायदा कलम ३,४,५,७, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची ही धडाकेबाज कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, पोलीस सहआयुक्त पुणे, श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे,  श्री. श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे डॅशिंग वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक, डॅशिंग महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार, नीलम शिंदे, राजश्री मोहीते, अजय राणे, इरफान पठाण, हनुमंत कांबळे, सुरेंद्र साबळे, साईनाथ पाटील, अमित जमदाडे, या पथकाने यशस्वी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra