
(श्री. नरसिंग कांबळे – ✍️ मुख्य संपादक)
पुणे : चतुर्शिंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या भल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून एकूण २८ इसमांविरोधात कारवाई केली.
बालेवाडी गावातील, दसरा चौकात, असलेल्या महाराष्ट्र मटन शॉप दुकानाच्या पाठीमागे, एका मोठ्या पत्राच्या शेडमध्ये भला मोठ्ठा कल्याण व मुंबई मटका जुगार अड्डा सुरु आहे. अशी खात्रीशीर माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने खात्री करून, छापा टाकला असता खेळणारे, खेळवणारे १७ आरोपी व ११ पाहिजे आरोपी असे एकूण २८ इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४(अ) ५,१२,(अ) अन्वये चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर ठिकाणावरून १ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर अटक/कारवाईत करण्यात आलेल्या आरोपी इसमाींकडून, तसेच घटना स्थळावरुन एकुण रूपये .१,५२,०५०/- कींमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यामध्ये रूपये. ८,९५०/- रोख, तसेच रूपये .६०,००० /- कींमतीचे १२ मोबाईल्स, रूपये .७०,०००/- कींमतीची मोटरसायकल व रूपये. १३,१००/- कींमतीचे जुगाराचे साहित्य, इत्यादींचा समावेश आहे.
सदर ठिकाणी केलेल्या अटक/कारवाई केलेल्या आरोपीत इसमांची नावे पुढीलप्रमाणे
अ) जुगार खेळविणारे आरोपींची नावे
१) वसंत रामलींग शींदे, वय ३२ वर्षे, धंदा – मजूर , रा.ठी. करण सोसायटी , मनपा शाळेसमोर, बालेवाडी , पुणे.
२) रवींद्र धोडींबा गजधाने, वय ४३ वर्षे, धंदा – नोकर , रा.ठी . प्राथमिक शाळेमागे, भोसरी , पुणे.
३) दीपक खंडू म्हात्रे, वय ४२ वर्षे, धंदा – नोकर , रा. ठी . धनगर बाबा, काळेवाडी , पुणे.
४) महेश निघना तलवार, वय ३२ वर्षे, धंदा – नोकर , रा. ठी. विश्वशांती कॉलनी नंबर २, पिंपळे सौदागर, पुणे.
ब) जुगार खेळणारे आरोपींची नावे.
५) सखाराम राघो पाडळे, वय ४५ वर्षे, धंदा – नोकर , रा.ठी . संभाजी नगर, माळुंगे, पुणे.
६) बबन आयलाजी वडमारे, वय ५१ वर्षे, धंदा- मजूर , रा.ठी . वाघमारे वस्ती, वाकड, पुणे.
७) विश्वास लक्ष्मण गायकवाड, वय ४२ वर्षे, धंदा – नोकर , रा. ठी. जाधव भट्टी , सांगवडे, पुणे.
८) धनंजय श्रीरंग सरोदे, वय ३० वर्षे, धंदा – नोकर , रा.ठी. गीतायोग बिल्डिंग जवळ, मनपा शाळेजवळ, बालेवाडी , पुणे.
९) द्रुपद गणपत खंखरे, वय ४० वर्षे, धंदा – नोकर , रा.ठी . विठ्ठल रुक्माई, कस्पटेवस्ती, वाकड, पुणे.
१०) महेंद्र सुदाम ओव्हाळ, वय ५६ वर्षे, धंदा – मजूर , रा.ठी. बुद्ध विहार, लक्ष्म नगर, पिंपळे गुरव, पुणे.
११) सोमनाथ भींगा सपकाळ, वय ३८ वर्षे, धंदा – नोकर , रा.ठी. शिवराज मित्र मंडळाच्या जवळ, बालेवाड, पुणे.
१२) गजानन मधुकर फुलारी, वय ३१ वर्षे, धंदा – नोकर , रा.ठी. जय भवानी सुपर मार्केट जवळ, बालेवाड , पुणे.
१३) कुमार सखाराम लोहार, वय ३२ वर्षे, धंदा – नोकर , रा.ठी. बळीराज गार्डन शेजारी, नकाते वस्ती, रहाटणी, पुणे.
१४) संदीप भाऊसाहेब कोळेकर, वय ४५ वर्षे, धंदा – नोकर , रा.ठी. साई चौक, बालेवाडी, पुणे.
१५) सुधाकर निवृत्ती वाघमारे, वय ४२ वर्षे, धंदा – नोकर , रा.ठी. महादेव कॉलनी, लक्ष्मी नगर, थेरगाव, पुणे.
१६) महेश हरीलाल कदम, वय ३८ वर्षे, धंदा – नोकर, रा ठी. माणगाव पारखेवस्ती, हिंजवडी, फेस ३, पुणे.
१७) अखलास मुनाफ शेख, वय ४५ वर्षे, धंदा – नोकर , रा. ठी. म्हाळुंगे मेन बस स्टॉप जवळ, म्हाळुंगे, पुणे.
क) सदर जुगार अड्ड्याचे चालक / मालक व घटनास्थळावरून पळून गेलेले पाहिजे आरोपींची नावे
१८) कमलेश उर्फ पिनूभाई भगवान ससाणे, धंदा – जुगार अड्डा मालक, रा. ठी. बालेवाडी फाटा, गणपती मंदिराच्या मागे,
बालेवाड, पुणे.
१९) भाऊ डांगे, धंदा – जुगार अड्डा मालक, (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही)
बाकी पोलीस छापा दरम्यान काही आरोपी पळून गेले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
सदरची ही धडाकेबाज कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, पोलीस सहआयुक्त पुणे, श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोहवा कर्पे, पोहवा राणे, पोहवा मोहीते, पोहवा चव्हाण, मपोहवा पुकाळे,
पोना माने, पोना कांबळे, पोशि चव्हाण, पोशि जमदाडे, पोशि कोळगे, पोशि कोळप, पोशि पाटील, पोशि पवार,
यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.



