पुणे सोलापूर महामार्गावर गोळीबार करत दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक जवळ स्कॉर्पिओ गाडीवर गोळीबार करून ३ कोटी ६० लाख रुपये लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला तातडीने सुरूवात केली. त्यानंतर या आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. आंगडीया कंपनीच्या वाहनातून ही लूट करण्यात आली होती. गोळीबार करत रक्कम लुटल्याप्रारकरणी इंदापूर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत ३ कोटी ६० लाख २६ हजारांच्या मुद्देमालापैकी फक्त १ कोटी ४३ लाख २० हजार रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम वसूल करणे अद्याप बाकी असल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे टाकले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तब्बल तीन तर इंदापूर पोलिसांची तीन अशी सहा पथके तैनात केली होती. पोलीसांच्या पथकाने सागर शिवाजी होनमाने राहणारा कुर्डूवाडी ता. माढा जि.सोलापूर याने इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सागर शिवाजी होनमाने, बाळू उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम (वय ३२ वर्षे) आणि रजत अबू मुलाणी (वय २४ वर्षे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदारासह गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीसांनी तपासात सागर होनमाने याकडून ७२ लाख रुपये, रजत अबू मुलाणी याचेकडुन ७१ लाख २० हजार रूपये असे एकूण १ कोटी ४३ लाख २० हजार रूपये जप्त केले आहेत. दोन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रत्येकी एक असे दोन पथक तात्काळ राजस्थान येथे रवाना केले होते. त्या पथकाने गुन्ह्यातील सहभाग असणारे आरोपी गौतम अजित भोसले (वय ३३ वर्षे ), किरण सुभाष घाडगे (वय २६ वर्षे), भूषण लक्ष्मीकांत तोंडे (वय २५ वर्षे ) यांना राजस्थान उदयपूर येथील प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक पोलीसांच्या मदतीने राजस्थान येथून ताब्यात घेतलेले आहे.



