अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मरूघा मटाचे प्रमुख शिवमूर्ती यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

(✍️ मुख्य संपादक : श्री. नरसिंग कांबळे)
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील मुरुघा मठाचे प्रमुख संत शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांना पोलिसांनी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचारप्रकरणी ताब्यात घेतले आहे.संत शिवमूर्ती यांच्यावर मठ संचालित संस्थेतील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मठातील दोन अल्पवयीन मुलांनी दिलेल्या तक्रारीनंतर म्हैसूर शहर पोलिसांनी शिवमूर्ती यांच्याविरुद्ध त्यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पॉक्सो) कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साडेतीन वर्षांपासून लैंगिक शोषण करण्यात येत होते
मठामार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींनी म्हैसूरमधील ओदानदी सेवा संस्थान या एनजीओशी संपर्क साधला होता. मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार मुरुघा मठ अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या १५ आणि १६ वर्षांच्या मुलींचे साडेतीन वर्षांपासून लैंगिक शोषण करण्यात येत होते. केवळ दोन मुलींवर नाही, तर मठप्रमुख संस्थेत शिकणाऱ्या इतर अनेक विद्यार्थिनींना त्रास देत आरोप ओदानदी सेवा संस्था या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख स्टेनली यांनी केला आहे. मात्र, भीतीपोटी मुलांनी ही बाब उघड केली नाही. आम्ही कोणत्याही दबावापुढे किंवा धमकीपुढे झुकणार नाही. पीडित मुलींना पूर्णपणे न्याय देणार असल्याचे स्टेनली म्हणाल्या. या एनजीओने जिल्हा बालकल्याण समितीला याबाबत माहिती दिली आहे. पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करीत आहेत. तपासानंतर सत्य लवकरच बाहेर येईल, असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्याबाबत भाष्य करणं योग्य नाही. चित्रदुर्गातील मुरुघा मठ राज्यात प्रसिद्ध आहे. ही घटना घृणास्पद आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्याअगोदर अंदाज बांधणे चुकीचे असल्याचे मत भाजप नेते ईश्वरप्पा म्हणाले.



