पुणे

चाकण येथे देशातील पहिल्या एलएनजी इंधनयुक्त ट्रक उत्पादन प्रकल्पाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‍घाटन

चाकण, ता. ३ : देशातील पहिल्या एलएनजी इंधनयुक्त ट्रक उत्पादन प्रकल्पाचे चाकणला उद्‍घाटन होत आहे याचा मला आनंद व अभिमान आहे. भविष्यात लिक्विफाईड नॅचरल गॅसचा पर्याय महत्त्वाचा आहे. या इंधनाची किंमत कमी असून, या इंधनाचा वापर वाढवणे महत्त्वाचे आहे. या इंधनाच्या वापरामुळे वाहन उद्योगावर चांगला परिणाम होणार आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीतील ब्लू एनर्जी मोटर्सकडून भारतातील पहिल्या एलएनजी इंधनयुक्त ग्रीन टच ट्रक उत्पादन प्रकल्पाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, ”एलएनजी इंधन हे भविष्यात डिझेल पेट्रोलला पर्यायी इंधन आहे. या इंधनामुळे वाहतुकीचा खर्च कमी येऊ शकतो. या इंधनामुळे प्रदूषण कमी होणार आहे. या इंधनामुळे वाहतुकीचा खर्च १६ टक्क्यांनी कमी होणार आहे. तो पुढील काळात अजूनही कमी होऊ शकतो. या इंधनाच्या माध्यमातून वाहतुकीचा खर्च कमी करणे हे आमचे ध्येय आहे. ते साध्य करायचे आहे. महाराष्ट्रात आम्ही एलएनजी आणि सीएनजी बायोमास पासून बनविण्याचा प्रयत्न करत आहोत. एलएनजी इंधन भविष्यात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अत्यावश्यक आहे. एक महत्त्वाचा पर्याय आहे. या इंधनाच्या निर्यातीला सुद्धा भविष्यात चालना मिळू शकते.”

कंपनीच्या वतीने एलएनजी इंधन असलेल्या ग्रीन टच ट्रकचा बाजारपेठेतील प्रवेश पहिले मॉडेल म्हणून सादरीकरण सुरू होणार आहे. ब्लू एनर्जी मोटर्सने भारतीय वाहन उद्योगाच्या नियम व मागणीनुसार डिझाईन आणि चाचणी केली आहे. या ट्रकचे सर्वात शक्तिशाली नैसर्गिक वायू इंजिन आहे. यावेळी ब्लू एनर्जी मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध भुवालका म्हणाले, ”आमच्या उद्योग प्रकल्पाचा एलएनजी इंधनाच्या माध्यमातून पर्यावरणामधील कार्बनचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न आहे.” यावेळी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच पुणे नाशिक महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे, सागर येळवंडे, गणेश नाणेकर, उद्योजक राजेंद्र वाळुंज, आदिती वाळुंज, प्रिया पवार व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra