गुन्हेपुणे

हिंदूराष्ट्रसेनेच्या तुषार हंबीरवर प्राणघातक हल्ला:ससून रुग्णालयात ३ ते ४ जण कोयते घेऊन शिरले, पोलिस कर्मचारी जखमी

पुणे : हिंदुराष्ट्रसेनेशी संबंधित असलेल्या तुषार हंबीर याच्यावर रुग्णालयात घुसून तीन ते चार जणांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. सोमवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांना रोखणारे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिस उपयुक्त सागर पाटील, बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. थेट ससून रुग्णालयात शिरून हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहरात मात्र खळबळ उडाली. दरम्यान, तुषार हंबीर याच्यावर यापूर्वी देखील येरवडा कारागृहात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हंबीर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खूनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो मोक्कामध्ये येरवडा कारागृहात बंद आहे. आजारी असल्यामुळे २५ ऑगस्टपासून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ३ ते ४ जण कोयते घेऊन ससून रुग्णालयात आले. त्याच्यावर उपचार सुरु असलेल्या ठिकाणी येऊन त्यांनी हंबीर याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यासोबत झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी सुद्धा जखमी झाला आहे. ससून रुग्णालयातील इन्फोसिस बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. रुग्णाला पहाण्यासाठी बहाणा करून हे हल्लेखोर हॉस्पिटलच्या आतमध्ये आले होते. अमोल बगाड असे जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page. This is ownership of Maharashtra Mitra